आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय शिक्षणमंत्र्यांना साकडे:विनाअनुदानित शिक्षकांना अनुदानितची संधी सुरू ठेवा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासगी शाळेतील शिक्षकांची विनाअनुदानितवरून अंशतः अनुदानित किंवा पूर्णतः अनुदानित शाळा किंवा तुकडीवर बदली करण्याचा निर्णय २८ जून २०१६ रोजी झाला. १ एप्रिल २०२१ रोजी त्यासाठी तरतूदही झाली. मात्र १ डिसेंबर २०२२ रोजी त्यास स्थगिती देण्यात आली. ही स्थगिती उठवावी, अशी मागणी शिक्षक क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज पाटील यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.

या संदर्भातील निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, १०-१५ वर्षांपासून विनाअनुदानित शिक्षकांना प्रगतीची संधी ळत होती. मात्र शिक्षक भरतीवर बंदी असतानाच्या कालावधीत विनाअनुदानित वरून अनुदानितवर बदली केल्याचा ठपका ठेवत स्थगिती दिल्याने शिक्षकांत रोष निर्माण झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...