आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपट एक स्वतंत्र कला:भाषा संवर्धनात चित्रपटांचे योगदान : प्रा. कदम

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट हे नाटक वा फोटोग्राफीचे विस्तारित रूप नाही तर ती एक स्वतंत्र कला आहे. भाषेप्रमाणे अभिव्यक्तीचे माध्यम असून मराठी चित्रपटांनी भाषा संवर्धनाचे मोठे काम केले आहे. मराठी चित्रपटांनी मराठवाडा, विदर्भ, कोकणातील बोलीभाषांना योग्य प्रकारे स्वीकारले आहे, असे प्रतिपादन ‘पाचोळा’चे दिग्दर्शक प्रा. शिव कदम यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाद्वारे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त बुधवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी समन्वयक डॉ. कैलास अंभुरे, लघुपटाचे दिग्दर्शक डॉ. विलास गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...