आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:दांडिया खेळण्यावरून पुन्हा वाद; तरुण जखमी, शिक्षिकेचा विनयभंग

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाच दिवसांपूर्वी म्हाडा कॉलनीत वाद झाल्याची घटना ताजी असतानाच पुंडलिकनगर परिसरातील संकुल अपार्टमेंटमध्ये दांडियावरून पुन्हा वाद झाला. तर न्यु मुकुंदवाडी येथील विश्वकर्मा मंदिराजवळ तिघांनी एका शिक्षिकेसोबत गैरप्रकार केला. याप्रकरणी संबंधित पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

दांडियात खेळण्यावरून वाद सुरू झाल्यानंतर सूरज प्रभाकर जाधव (२२) याला दोघांनी मारहाण केल्याची तक्रार पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली. ३ ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजता जाधवचा गजानन खैरे व अनिल सुरडकर यांच्यासोबत वाद झाला. त्यातून दोघांनी लोखंडी खुर्चीने वार करून जखमी केल्याचा आरोप जाधवने केला आहे.

मुकुंदवाडीत तरुणींशी हुज्जतबाजी दांडिया खेळण्यावरून चार तरुणांनी दांडियांत घुसून धिंगाणा घालत एका शिक्षिकेसोबत गैरप्रकार करुन मारहाण केल्याची घटना ३ ऑक्टोबरला घडली. याप्रकरणी करण चव्हाण, सौरभ जेठेसह त्यांच्या एका साथीदारावर मारहाण, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शिक्षिका महिला ३ ऑक्टोबर रोजी मैत्रिणींसह न्यु मुकुंदवाडी येथील विश्वकर्मा मंदिराजवळ दांडिया खेळण्यासाठी गेली हाेती. तेथे रात्री १० वाजता करण, धनंजय, सौरभने महिलांना शिविगाळ सुरू केली. आम्हाला दांडिया का खेळू देत नाही, असे म्हणत त्यांनी धिंगाणा घालून तरुणींशी हुज्जत बाजी केली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...