आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा:कन्व्हेन्शन सेंटर, डिफेन्स क्लस्टर, स्टार्टला चालना द्या; सीएमआयएची दिल्लीत मागणी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात मोठी गुंतवणूक व्हावी यासाठी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए) संस्थेने पुढाकार घेऊन दिल्लीत विविध संस्थांच्या उच्चाधिकाऱ्यांची भेट घेतली. औरंगाबादेतील अफाट क्षमता, पर्यटनदृष्ट्या महत्त्व, कनेक्टिव्हिटी आणि शहराच्या संस्कृतीविषयी सादरीकरण केले. या वेळी कन्व्हेन्शन सेंटर, डिफेन्स क्लस्टर तसेच स्टार्टअपला चालना देण्याविषयी इन्व्हेस्ट इंडिया, रक्षा मंत्रालय, नीती आयोग आणि एमएसएमई मंत्रालयातही टीमने चर्चा केली. या टीममध्ये सीएमआयए अध्यक्ष नितीन गुप्ता, मानद सचिव अर्पित सावे, उपाध्यक्ष दुष्यंत पाटील, सहसचिव सौरभ भोगले, मॅजिकचे संचालक आशिष गर्दे आदींचा समावेश आहे.

जानेवारीत औरंगाबादेत विविध देशांचे दूतावास येणार
इन्व्हेस्ट इंडियाचे एमडी आणि सीईओ दीपक बागला यांची भेट घेतली. या वेळी औरंगाबादेत इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर स्थापण्याबद्दल चर्चा झाली. यात अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला गती देण्याचे आश्वासन बागला यांनी दिले. जानेवारीत औरंगाबादेत विविध देशांचे दूतावास आणि व्यापार संस्थेच्या अधिकाऱ्यांची बैठक हाेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डिफेन्स क्लस्टरची मागणी
रक्षा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संजय जाजू यांचीही भेट घेतली. औरंगाबादेत आता डिफेन्स क्लस्टरची स्थापना करावी, अशी मागणी टीमने केली. औरंगाबादेत रक्षा क्षेत्राशी निगडित मोठ्या गुंतवणुकीला आकर्षित करण्याची क्षमता असून ऑरिक बिडकीन येथे हे क्लस्टर स्थापन केल्यास रोजगारांच्या संधी प्राप्त होतील.

जागतिक दर्जाचे इन्क्युबेशन सेंटरही हवे
स्टार्टअप इकोसिस्टिम विकासाकरिता जागतिक दर्जाचे इन्क्युबेशन केंद्र, टेक्नॉलॉजी पार्क, रिसर्च आणि डेव्हलपमेंट केंद्राची स्थापना करावी, स्टार्टअप्ससाठी नवे प्रकल्प हवेत, अशीही मागणी टीमने केली.

जी-२० परिषदेत औरंगाबादला संधी : डॉ. निरुपमा डांगे : जी-२० परिषदेच्या बैठका देशातील निवडक शहरात होणार आहेत. यात औरंगाबादचाही समावेश आहे. यामधून औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्रात मोठी संधी निर्माण होईल, असे दिल्लीमधील महाराष्ट्र सदनाच्या अतिरिक्त निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे म्हणाल्या. ही बैठक औरंगाबादेत व्हावी यासाठी सीएमआयएच्या वतीने मुकुंद कुलकर्णी, सुयोग माछर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...