आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्षाचा नारा:स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे 13 नोव्हेंबरला अधिवेशन

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतचा काळ हा संघर्षाचा आणि विजयाचाही राहिलेला आहे. अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न व समस्या घेऊन एसएफआय अनेक वर्षे संघर्ष करत आहे. आजच्या कठीण काळातसुद्धा संघटना स्वतंत्र लोकशाही व समाजवादाचा झेंडा घेऊन व शिक्षण, संघर्षाचा नारा देत जनविरोधी सत्तेविरोधात उभी आहे. अशा संघटनेचे ४१ वे जिल्हा अधिवेशन (१३ नोव्हेंबर) रविवारी सिटू भवन, खोकडपुरा येथे होत आहे. सभागृहाला विठ्ठल मोरे यांचे नाव दिले आहे. उद्घाटन पत्रकार डॉ. शेखर मगर यांच्या हस्ते होईल. राज्य उपाध्यक्ष अनिल मिसाळ, सहसचिव नितीन वाव्हळे व जिल्हाध्यक्ष लोकेश कांबळे हे उपस्थित राहणार आहेत, असे राज्य कमिटी सदस्य अशोक शेरकर, विश्वजित काळे, गणेश अलगुडे, मनीषा बल्लाळ, गजानन शिंदे, आकाश जगताप, सौमिक मंडळ, आकाश जाधव यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...