आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांसाठी पथदर्शक:‘क्वालिटी सर्कल’चे शहरात अधिवेशन; देशभरातून 25 हजार उद्योजक होणार सहभागी

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

क्वालिटी सर्कल फॉर्म ऑफ इंडियाचे (क्यूसीएफआय) राष्ट्रीय अधिवेशन २६ ते २९ डिसेंबरदरम्यान एमजीएममध्ये होणार आहे, अशी घोषणा नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश मिश्रा यांनी केली, अशी माहिती औरंगाबाद शाखाध्यक्ष नितीन किनगावकर यांनी दिली. संघटनेच्या देशभरात ३३ स्थानिक शाखा आहेत. उद्योगाच्या गुणवत्ता विकासासाठी विविध कार्यक्रमांचे तसेच स्पर्धांचे आयोजन संघटनेच्या माध्यमातून केले जाते. दरवर्षी एका स्थानिक शाखेला अधिवेशनाचे यजमानपद भूषवण्याची संधी दिली जाते. शाखेच्या स्थापनेपासून आयोजित केलेल्या विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचा आढावा घेत गुण दिले जातात. या वर्षी विविध कसोट्यांवर परीक्षण केल्यानंतर सर्वोच्च गुण औरंगाबादला मिळाल्याने ही संधी दिली आहे. अधिवेशनात देशभरातून २५ हजार उद्योजक, विविध उद्योगांचे प्रतिनिधी सहभागी होतील. शहरातील औद्योगिक संस्थांसह विद्यार्थ्यांसाठीही हे आधिवेशन पथदर्शक ठरेल, असे मत किनगावकर यांनी व्यक्त केले.
बैठकीच्या यशस्वितेसाठी औरंगाबाद स्थानिक शाखेचे नरेंद्र जोशी, विजय कडलक, डॉ. अभय कुलकर्णी, सुधीर पाटील, संजय वैद्य, अमोल गिरमे, महेंद्र वानखेडे, विनिता पांडा, संदीप असावा, मंगलदास चोरगे, अस्मिता जोशी, दीपा देशपांडे, अश्विनी देऊळकर तसेच प्रसिद्धिप्रमुख सुदर्शन धारूरकर आदींनी सहकार्य केले.

क्वालिटी सर्कल फोरम पश्चिम विभागाच्या संचालकपदी नितीन किनगावकर उत्पादन क्षमतेत वाढ करणे, उत्पादनाची किंमत कमी करणे तसेच नुकसानकारक घटक कमी करणे अशा विविध घटकांवर एकाच वेळी काम करून गुणवत्ता सुधारण्याचे काम क्वालिटी फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून केले जाते. फोरमच्या पश्चिम विभागात महाराष्ट्र आणि गुजरातमधील ८ चॅप्टरचा समावेश आहे. या विभागाच्या संचालकपदी औरंगाबादचे नितीन किनगावकर यांची निवड करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...