आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय विधी विद्यापीठ:उद्या सीए उत्तीर्णांसाठी दीक्षांत समारंभ ; प्रसिद्ध मान्यवर असणार उपस्थित

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने पश्चिम विभागातील नवीन पात्र चार्टर्ड अकाउंटंट्ससाठी गुरुवारी सकाळी १० वाजता सातारा परिसरातील आईसीएआय भवन येथे दीक्षांत समारंभ आयोजित केला आहे. हा पहिलाच समारंभ आहे. केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. व्ही. एस. सरमा यांच्या हस्ते उद्घाटन हाेइल. सीए देबाशिस मित्रा अध्यक्षस्थानी राहतील. उपाध्यक्ष सीए अनिकेत तलाठी दिल्लीहून कार्यक्रमाला ऑनलाइन संबोधित करतील. या वेळी सुमारे ३०० नवीन पात्र चार्टर्ड अकाउंटंट दीक्षांत समारंभात सहभागी होणार आहेत, अशी माहिती संयोजकांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...