आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना राज्यात:50 हजारांहून जास्त कोरोना रुग्ण 14 जिल्ह्यांत; नागपुरात रिकव्हरी रेट सर्वात कमी

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना चाचणी : राज्यात कोरोना निगेटिव्हचे प्रमाण 85 टक्के, आजवर दोन कोटी चाचण्या

राज्यात मार्च २०२० पासून चार एप्रिल २०२१ पर्यंत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळणारे एकूण १४ जिल्हे आहेत. या जिल्ह्यांत गेल्या वर्षभरात ५० हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यात कोरोनामुक्त झालेले सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात आजवर ५,७६,७५८ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी ४,८६,९५८ रुग्ण आता कोरोनामुक्त झाले आहेत. याउलट या १४ जिल्ह्यांत औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) सर्वात कमी ८०.५ टक्के आहे, तर कोल्हापूरचा रिकव्हरी रेट सर्वाधिक ९४.७ टक्के आहे.

कोरोना चाचणी : राज्यात कोरोना निगेटिव्हचे प्रमाण ८५ टक्के, आजवर दोन कोटी चाचण्या
राज्यात चार एप्रिलअखेर २,०५,४०,११ कोरोना टेस्ट झाल्या असून त्यात पाॅझिटिव्ह येण्याचे प्रमाण फक्त १४.७% आहे. एकूण चाचण्यांपैकी १,७५,२९,५१४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. हे प्रमाण एकूण चाचण्यांच्या तुलनेत ८५.३ % आहे. तर ३०,१०,५९७ (१४.७%) जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले.

मार्च २०२० ते एप्रिल २०२१ : एक लाखावर रुग्णांचे सहा जिल्हे, सर्वाधिक कोरोनामुक्त रुग्ण पुणे जिल्ह्यात
एकूण निगेटिव्ह
1,75,29,514
एकूण पाॅझिटिव्ह
30,10,597
राज्यात झालेल्या एकूण चाचण्या
2,05,40,111

बातम्या आणखी आहेत...