आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Corona Aurangabad | Aurangabad Govt Hospital | Marathi News | Both Ministers From Marathwada, However, Did Not Get Permission For Genome Sequencing Laboratory In The Valley

रुग्णांचा आकडा 100 पार:दोन्ही मंत्री मराठवाड्याचे, तरीही घाटीत जीनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळेला परवानगी मिळेना

प्रवीण ब्रह्मपूरकर | औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ओमायक्रॉनची लागण शोधण्यासाठी अत्यावश्यक जीनोम सिक्वेन्सिंग लॅब औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात सुरू करण्याची तयारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली. पण त्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून परवानगी मिळालेली नाही. घाटीवर १४ जिल्ह्यांचा भार आहे. औरंगाबादेत कोरोना रुग्णांचा आकडा मंगळवारी १०० पार झाला.

तरीही शासनाकडून दप्तर दिरंगाई सुरू आहे. आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री मराठवाड्याचे असतानाही अशी दिरंगाई दुर्दैवी असल्याची टीका घाटी अभ्यागत समितीचे माजी अध्यक्ष, आमदार अतुल सावे यांनी केली आहे. तर मंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे आमदार प्रदीप जैस्वाल म्हणाले.

घाटीच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे यांनी सांगितले, लॅब (प्रयोगशाळा) सुरू करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे परवानगी मागितली असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची सोमवारी याबाबत बैठक झाली आहे. जिल्हाधिकारीही प्रस्ताव पाठवत असून पाठपुरावा करणार आहेत.

...तर तीन दिवसांत अहवाल
घाटीत जीनोम सिक्वेन्सिंगची सुविधा झाल्यास दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी अहवाल मिळेल. सध्या पुण्यातून अहवाल येण्यास पाच ते सहा दिवस लागतात. सध्या औरंगाबादमध्ये ओमायक्रॉनचे दोनच रुग्ण आहेत. मात्र, राज्यातील स्थिती पाहता रुग्ण वाढतील. तेव्हा शहरातील लॅब महत्त्वाची ठरणार आहे. परवानगीविषयी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रभारी वैद्यकीय संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याशी संपर्क साधला असता लवकरच निर्णय घेऊ, असे म्हणत अधिक बोलणे त्यांनी टाळले.

बातम्या आणखी आहेत...