आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा धोका कायम:देशात एका कोरोनाबाधित रुग्णापासून होऊ शकते दोघांना बाधा; जनतेच्या बेजबाबदारपणामुळे 75% लोकसंख्येला धोका कायम

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण फक्त 1.32%, आठवड्यात मृत्यू 96 पर्यंत कमी झाले तरी रोज 10 हजार रुग्ण

देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मृत्यूंची संख्याही घटत असली तरी कोरोनाचा धोका मात्र अजून संपलेला नाही. अजूनही देशात रोज १० हजार रुग्ण आढळत अाहेत. आयसीएमआरचे एपिडेमोलॉजिस्ट आणि कम्युनिकेबल डिसीजचे शास्त्रज्ञ डॉ. समीरन पांडा यांनी सांगितले, ‘राष्ट्रीय सिरो सर्व्हेनुसार देशातील ७५ टक्के लोकांचा धोका टळलेला नाही.’ सध्या देशात एकूण कोरोना रुग्ण फक्त १ लाख ४३ हजार (१.३२%) आहेत. गेल्या आठवड्यातील मृत्यूंची संख्या पाहता ती आता ९६ वर आली आहे.

ग्रामीण भागात दीर्घकाळ रुग्ण आढळण्याची शक्यता

पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया (पीएचएफआई) चे अध्यक्ष प्रो. के श्रीनाथ रेड्डी यांच्यानुसार, मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आणि आता लसीमुळे विषाणूचा संसर्ग कमी झाला. परंतु, तो संपलेला नाही. ग्रामीण भागात हा रोग अद्याप पूर्ण फैलावलेला नाही. आगामी काळात तो असाच फैलावत राहिला तर दीर्घकाळ कोरोना रुग्ण आढळत राहतील.

मोठ्या शहरांत ६०% लोक बरे झाले, इतरत्र ही स्थिती नाही

अशोका व्ही. व्ही. के. त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्सेसचे संचालक व्हायलॉलॉजिस्ट प्रो. शाहिद जमील म्हणाले, सिरो सर्व्हेनुसार दिल्ली व मुंबईसारख्या शहरांत सुमारे ६०% लोकसंख्येला संसर्ग होऊन बरा झाला. इतरत्र मात्र ही स्थिती नाही. यानुसार, २५ वर्षे वयाच्या लोकांत विषाणूचा हा संसर्ग अधिक वाढला असावा.

फ्रान्समध्ये ७५% लोकसंख्येत अँटिबॉडी सापडूनही रुग्ण वाढले

डॉ. पांडा यांनी सांगितले, फ्रान्समध्ये एका सिरो सर्व्हेत नमूद होते की, सुमारे ७५% लोकसंख्येत अँटिबॉडीज सापडल्या. तरी तेथे कोरोनाची दुसरी लाट आली. इंग्लंडमध्ये एक वेळ फक्त ५०० रुग्ण आढळत. लोक बेजबाबदारपणे वागले आणि आता एका दिवसात पुन्हा विक्रमी म्हणजे तब्बल २५ हजार रुग्ण आढळू लागले आहेत.

मोठ्या शहरांत ‘आर’ नंबर १.५, छोट्या शहरांत २.५ जवळ

डॉ. पांडा यांच्यानुसार देशात प्रत्येक कोरोना रुग्णापासून दोघांना संसर्ग होण्याचा धोका कायम आहे. विषाणूंच्या प्रजनन दराचे मूल्यांकन त्याच्या रिप्रॉडक्टिव्ह नंबरवरून (आर नंबर) होते. देशात मोठ्या शहरांत हा आर नंबर १.५ तर छोट्या शहरांत २.५ आहे. म्हणजेच विषाणू मोठ्या शहरांत एक, छोट्या शहरांत दोघांना बाधित करू शकतो.

बातम्या आणखी आहेत...