आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Corona Cases Increased Rapidly From Vidarbha Strain; The Focus Of Administration Remains On Injection Oxygen, Not On Preventing Infection; News And Live Updates

औरंगाबादमध्ये दुर्लक्ष करणे पडले महागात:विदर्भ स्ट्रेनमुळे वाढले कोरोनाचे नवे रुग्ण; प्रशासनाचे लक्ष फक्त इंजेक्शन-ऑक्सिजनवर, संसर्ग रोखण्यावर नाही

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वीलेखक: विनोद यादव
  • कॉपी लिंक
  • दिव्य मराठीने उल्कानगरी येथे लष्करी आरोग्य सेवेचे माजी उपसंचालक डॉ. सविश ढगे यांच्याशी संवाद साधला

राज्यात कोरोना महामारीमुळे नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामध्ये नाशिक, पुणे आणि औरंगाबाद शहराचा समावेश असून याचा मृत्यू दर 1.33% आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर 1.73% आहे तर देशाचा 1.27% एवढा आहे. ह्या आकड्यांची तुलना केल्यास या शहरांचा मृत्यू दर राज्य आणि देशापेक्षाही जास्त आहे. त्यामुळे या शहराची ग्राऊंड रिपोर्ट समजून घेण्यासाठी दैनिक दिव्य मराठीच्या टीमने याचा सर्वे केला. तो आपण जाणून घेऊया...

दुर्लक्ष केल्यामुळे नवीन प्रकरणे आणि मृत्यूंचा आकडा वाढला
दिव्य मराठीने उल्कानगरी येथे लष्करी आरोग्य सेवेचे माजी उपसंचालक डॉ. सविश ढगे यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, औरंगाबादमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढण्याचे कारण विदर्भ स्ट्रेन आहे. यामुळे औरंगाबादसह इतर जिल्हातही कोरोनाचे नवीन रुग्ण येण्याचे प्रमाण वाढले. त्यासोबतच मृत्यूच्या दरातही वाढ होत राहिली.

डॉ. ढगे यांच्या मते, कोरोना व्हायरसमध्ये गेल्या दीड वर्षात चार हजार वेळा बदल पाहायला मिळाले आहे. हा व्हायरस डबल म्यूटेटेड स्ट्रेनच्या नावाने ओळखला जात असून यामध्ये दोन वेळा जेनेटिक बदल झाले. ते पुढे बोलताना म्हणाले की, सुपर स्प्रेडिंग इव्हेंट्स, घातक कोरोनाचे नवीन विषाणू आणि विश्रांती या कारणामुळे लोकांमध्ये हालचाली वाढल्या. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे ते म्हणतात.

प्रशासनावर बोलताना ते म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांकडे संकट व्यवस्थापन, कौशल्य, प्रभुत्व असायले हवे. नसेल तर त्यांनी तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. गेल्या दीड वर्षापासून स्थानिक प्रशासन याबाबीत अपयशी ठरले आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी
डॉ ढगे म्हणतात, प्रशासन मृत्यू दरावर असा युक्तिवाद करतात की, लोक रुग्णालयात येण्यास उशीर करत असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. परंतु, ते प्रश्न उपस्थित करताना म्हणतात की, जर लोक उशीरा येत असेल यामध्ये चुक प्रशासनाची आहे.

प्रशासनाचे काम लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आहे. परंतु, स्थानिक प्रशासन चांगल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे ते म्हणतात.

मंगळवार, बुधवारी लसीकरण सुरू
औरंगाबाद शहरात मनपाने जम्बो लसीकरण मोहीम सुरू केली. यात रविवारी लसीकरण बंद ठेवले होते. लस नसल्याने ही मोहीम बंद ठेवल्याचे सांगण्यात येत आली. मात्र रविवारी कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी मोहिम बंद ठेवल्याचे मनपाने सांगितले होते. सोमवारी लस प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे मंगळवारी 13 एप्रिल रोजी गुढीपाडव्याची तर 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सार्वजनिक सुट्टी असली तरी लसीकरण मोहीम सुरू राहणार असल्याने मनपा आरोग्य अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...