औरंगाबादकर व्यवसायिकांना पटले सोशल डिस्टन्सचे महत्व; माल खरेदी करा पण सीमा रेषेच्या पलिकडून

  • शहराच्या अन्य भागातही दुकानदारांनी सामाजिक अंतराचे भान जपण्यात सुरुवात केली

प्रतिनिधी

Mar 26,2020 03:22:19 PM IST

संतोष काळे

औरंगाबाद- तळेगाव, पन्हाळा, नांदेडनंतर आता औरंगाबादकर व्यवसायिकांमध्येही सोशल डिस्टन्सबद्दल जागरूकता निर्माण होऊ लागली असल्याचे बघायला मिळत आहे. शहरातील काही दुकानदारांनी स्वतःहूनच माल खरेदी विक्री करताना ग्राहकांनी सोशल डिस्टन्सचा नियम पाळावा असे फलक आपल्या दुकानात लावायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

संचारबंदीमधून जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत. परिणामी डेअरी आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंची दुकाने (डेली नीडस शॉप्स) सुरू आहेत. दही , दूध तसेच अन्य फुटकळ किराणा सामान घेण्यासाठी या दुकानात ग्राहक येत असतात. पण बऱ्याचदा एकदम पाच-सहा ग्राहक आल्यानंतर संचारबंदीचा नियम मोडला जात असल्याने दुकानदारांची पंचाईत होत आहे.

विद्यानगरी मध्ये एका दुकानदाराने तर यावर उपाय म्हणून आपल्या दुकानासमोर दोरखंड बांधून दुकान आणि ग्राहक यांच्यात "सोशल डिस्टन्स सीमारेषा" तयार केली आहे. व्यवहार करायचे तर ते दोरीच्या मागूनच अशी दुकानदाराची भूमिका आहे.

"कोरोना संसर्ग आजारामुळे किराणामालाची अंतर ठेवूनच देवाण-घेवाण करावी फोन पे चा वापर करावा" असा फलकच या दुकानदाराने लावला असल्याचे दिसून येत आहे. रोखीचा व्यवहार टाळावा यासाठी या दुकानदाराने डिजिटल व्यवहाराचा पर्याय स्वीकारला आहे"

माझे दुकान आणि घर एकच आहे घरी दोन लहान मुले आहेत आपण आपली काळजी घेतली आपण आपली काळजी घेतली तरच आपल्या मुलांची काळजी घेऊ शकू यासाठीच मी तीन दिवसांपूर्वी हा सोशल डिस्टन्स मार्ग स्वीकारला असल्याचे या दुकानदाराने "दिव्य मराठी" शी बोलताना सांगितले.

औरंगाबाद शहराच्या अन्य भागातही दुकानदारांनी सामाजिक अंतराचे भान जपण्यात सुरुवात केली आहे जालन्यामध्ये एका दुकानदाराने तर आपल्या दुकानासमोर प्लास्टिकचे पिंपळा वरून सोशल डिस्टन्स ची भिंत तयार केली आहे एका वेळी फक्त एकच ग्राहक दुकानात जाऊ शकतो असे अन्य एका दुकानदाराने बोलताना सांगितले.

X