आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू तर 119 ऑक्सीजनवर, मृत्यूचा आकडा शतकाच्या उंबरठ्यावर

हिंगोली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • परिस्थितीपाहूनच लॉकडाऊन वाढविण्याबाबत निर्णय ः रुचेश जयवंशी,जिल्हाधिकारी हिंगोली

हिंगोली जिल्ह्यात बुधवारी (ता. ३१) तब्बल ६ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला असून ११९ रुग्ण अद्यापही ऑक्सीजनवर आहेत. तर आता मृत्यूचा आकडा शतकाच्या उंबरठ्यावर आला असून हिंगोलीकरांनी आता काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

हिंगोली जिल्हयात मागील काही दिवसांत रुग्णांची संख्या किमान ९० पेक्षा अधिक आहे. मंगळवारी (ता. ३०) एकाच दिवशी तब्बल २२४ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आजचा दिवस मात्र हिंगोलीकरांसाठी चांगलाच धडकी भरविणारा ठरला आहे. आज एकाच दिवसांत ६ कोविड रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज मयत झालेल्या ६ रुग्णांचे मृतदेह आवश्‍यक खबरदारी घेऊन त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.

आज पर्यंत कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ९० झाली असून अद्यापही ११९ रुग्ण ऑक्सीजनवर आहेत तर त्यापैकी १५ रुग्ण बायपॅप मशीनवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या सुत्रांनी सांगितले. आज हिंगोली जिल्हयात १७४ रुग्ण आढळून आले असून १२६ रुग्णांची प्रकृती चांगली झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर सध्याच्या स्थितीत ७६१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत हिंगोली जिल्हयात ६५६७ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ५७१६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

दरम्यान, हिंगोलीकरांना आता कोरोनाची परिस्थिती गंभीरतेने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दिवसागणीक वाढणारे रुग्ण व दररोज रुग्णांचा मृत्यू जिल्हावासीयांसह प्रशासनाला धडकी भरविणारा आहे. नागरीकांनी आता कोविडच्या सर्व प्रतिबंधात्मक उपाय पाळण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

परिस्थितीपाहूनच लॉकडाऊन वाढविण्याबाबत निर्णय ः रुचेश जयवंशी,जिल्हाधिकारी हिंगोली

हिंगोली जिल्हयातील जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य दिले जात आहे. नागरीकांचे आरोग्य लक्षात घेऊनच लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. या काळात आरोग्य व्यवस्था बळकट करण्यास संधी मिळाली आहे. ता. ४ एप्रील पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. त्यानंतर परिस्थिती पाहूनच पुढील निर्णय घेतला जाईल. नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.

बातम्या आणखी आहेत...