आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनी मंत्रालयात कोरोनाचा शिरकाव:आजी-माजी सभापतींसह जि.प. अध्यक्षांचे पतीही पॉझिटिव्ह : पाच दिवसांपासून जि.प. बंद

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कारभार पाहणाऱ्या मिनी मंत्रालयातून कोरोना पाय काढत नसल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागासह पंचायत, वित्त विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांपाठोपाठ आता पदाधिकाऱ्यांनाही कोरोनाने विळख्यात घेतले आहे. मागील पाच दिवसांपासून जि.प.तील कार्यालय बंद असून, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे.

माजी अर्थ व बांधकाम सभापती, जि.प. अध्यक्षांचे पती तथा काँग्रेसचे औरंगाबाद तालुकाध्यक्ष यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

सुरवातीला आरोग्य विभागात कोरोना शिरला. आरोग्य विभागातील तब्बल ११ कर्मचारी बाधित झाल्यानंतर प्रशासनाने केलल्या उपाययोजनानंतर कोरोना नियंत्रणात आला होता. परंतू त्यानंतर अर्थ व बांधकाम सभापती पॉझिटिव्ह आले. त्यांच्या काही दिवसांनी पंचायत विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विस्तार अधिकारी, वित्त विभागातील रोखपाल यांना कोरोना झाल्याचे समोर आल्याने अख्खी जिल्हा परिषद मागील पाच दिवसांपासून बंद ठेवण्यात आलेली आहे. मुंबई दौऱ्यानंतर माजी अर्थ व बांधकाम सभापती तथा जि.प. सदस्य यांचा रिपोर्ट शनिवारी पॉझिटिव्ह आला होता. या दौऱ्यात सोबत असल्याने जि.प. अध्यक्षाचे पती यांनीही रविवारी चाचणी करून घेतली असता, त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सीईओ, आरोग्य सभापती निगेटिव्ह

आरोग्य व शिक्षण सभापती यांना व्हायरल न्यूमोनिया झाल्याने, ते शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर बैठकांच्या निमित्ताने पॉझिटिव्ह अधिकाऱ्यांच्या संपर्कात आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी हेही होम क्वॉरंटाइन आहेत. त्यांचा ॲण्टीजेन टेस्ट व आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्टही नेगिटिव्ह आला आहे.

बातम्या आणखी आहेत...