आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली कोरोना परिस्थिती:पोलिस विभागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याची भिती, पोलिस निरीक्षकाचा अहवाल पॉझिटिव्ह, ॲन्टीजन चाचणी करण्याचे पोलिस विभागाचे पत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस निरीक्षकाचा कोरोना अहवाल पॉझीटिव्ह आला असून त्यानंतर पोलिस दल देखील हादरून गेले आहे. जिल्हा विशेष शाखेतील पोलिस कर्मचाऱ्यांची ॲन्टीजन चाचणी करण्याचे पत्र पोलिस विभागाने शासकिय रुग्णालयास दिले आहे. मात्र शुक्रवारी ता. ७ दुपारपर्यंत कोणीही कार्यालयाकडे फिरकलेच नसल्याने कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सुर उमटू लागला आहे.

येथील पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षकाकडे जिल्हा विशेष शाखेचा पदभार देण्यात आला होता. त्यानंतर पुर्वीचे निरीक्षक हजर झाल्याने पदभार घेतलेेले निरीक्षक ता. १ ऑगस्ट रोजी लातुर जिल्हयात त्यांच्या गावी गेले आहेत. त्या ठिकाणी त्यांना ताप येत असल्याने त्यांनी कोरना चाचणी करून घेतले. त्यासाठी दिलेल्या स्वॅब चाचणीमध्ये त्यांचा कोरोना अहवाल पॉझीटिव्ह आला आहे. या प्रकाराची माहिती हिंगोली जिल्हा पोलिस दलास देण्यात आली आहे. त्यानंतर पोलिस विभागाने तातडीने शासकिय रुग्णालयास पत्र दिले आहे. या पत्रात जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची रॅपीड ॲन्टीजन चाचणी करून घेण्याचे पत्राद्वारे कळविले आहे.

दरम्यान, गुरुवारी ता. ६ पत्र देऊन देखील या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याचे काम अद्यापही हाती घेण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले आहे. या शिवाय आज दुपारपर्यंत चाचणीसाठी कोणीही आले नसल्याचे सुत्रांनी सांगितले. तर या चाचणीनंतरच आलेल्या अहवालानंतर पुढील कार्यवाही होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.