आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत कार्यरत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी माहिती मागविली

औरंगाबाद        एका वर्षापूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत कार्यरत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी माहिती देण्याचे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी विभागीय उपसंचालकांना तसेच जि.प. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना दिले आहे.

राज्यात सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव सुरू असल्याने त्याचा प्रतिबंध करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळांतील जे शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार क्षेत्रिय स्तरावर सर्वेक्षण अथवा इतर अनुषंगिक बाबींसाठी नियुक्त करण्यात आले आहे. अशा शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची माहिती doescondary1@gmail.com या ईमेलवर पाठवायची आहे. त्यात जिल्हा, शाळेचे नाव, कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या, कामाचे स्वरूप, अभिप्राय या बाबींचा समावेश असणार आहे. ही माहिती शुक्रवारपर्यंत (दि.8)  विभागीय उपसंचालकांना तसेच जि.प. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी पाठविणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...