आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:शाळेत येण्यापूर्वी कोरोना तपासणीचे प्रमाणपत्र शिक्षकांना अनिवार्य; पालकांचे समंमतीपत्र असणारे पाल्य शाळेत, कुणालाही सक्ती नाही

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोराना विषाणूच्या प्रदुर्भावामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांचे गेट अखेर येत्या २३ नोव्हेंबर पासून उघडणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती काळजी घेऊन इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गांना सुरुवात होत आहे. अनुषंगाने सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना शाळा निर्जंतुकीकरणासंदर्भात सूचना देण्यात आल्या असून, शिक्षकांना कोरोनाची तपासणी केल्याचेे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ते प्रमाणपत्र असल्याशिवाय शिक्षकांनी स्वत:च शाळेत येवू नये असे माध्यमिक शिक्षणाधिणाधिकारी बी.बी. चव्हाण यांनी सांगितले असून, नववी ते बारावीचे वर्ग भरवतांना विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती करता येणार नाही. पालकांच्या संमती प्रमाणपत्र असणारे पालक शाळेत येतील असेही चव्हाण यांनी बुधवारी झालेल्या ऑनलाइन बैठकीत सांगितले. शाळा सुरु करण्यापूर्वी विद्यार्थी आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीकोनातून करण्याच्या उपाय योजनांसाठी आढावा बैठक बुधवारी ऑनलाइन घेण्यात आली. यावेळी शिक्षण उपसंचालक मधुकर देशमुख, शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांच्यासह ५५० पेक्षा अधिक मुख्याध्यापक, शिक्षक सहभागी झाले होते.

कोरोनामुळे नव्या शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र संपले तरी शाळा सुरु न झाल्याने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळा सुरु करण्याबाबत पालक, शिक्षकांप्रामणेच शासन दरबारी देखील मतभिन्नता आहे. असे असले तरी आता २३ पासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतल्याने सर्व शाळांना निर्जंतूकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, वेतनेत्तर अनुदानातात निर्जंतूकीकरणासाठी लागणार खर्च समाविष्ट करण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी सांगितले असून, स्वयंअर्थसहाय्य असणाऱ्या शाळांना मात्र स्वत:च सर्व खर्च करावा लागणार आहे. दरम्यान सर्व शिक्षकांची कोराना तपासणी करुन घेणे हे त्या त्या शाळेतील मुख्याध्यापकांची जबाबदारी असणार आहे. जे शिक्षक कोराेना तपासणी केल्याचे प्रमाणपत्र सादर करतील त्यांनाच शाळेत येता येईल. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती शाळांनी करायची नाही. तर जे पालक शाळेत पाठविण्यास तयार आहेत. त्यांचे हमीपत्र पाहून त्या विद्यार्थ्यांना शाळेत येता येणार आहे. तसेच एका वर्गात ६० विद्यार्थी असले तर एक बाक सोडून एका बाकावर एक असे करुन ३० च विद्यार्थी एका वर्गात शाळांना बसवायचे आहेत. ग्रामीण भागात आरोग्य अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांना सूचित करण्यात आले आहे. तर ऑक्सिमीटर आणि थर्मल गण पंचायतींनी पुरवाव्यात असेही सांगण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

अशा आहेत शाळांसाठी मार्गदर्शक सूचना -

- शाळांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण करणे

- बाधितांना डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच शाळेत प्रवेश मिळेल

- विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत पालकांची लेखी संमती घेणे

- एका बाकावर फक्त एकच विद्यार्थी बसणार

- विज्ञान, गणित, इंग्रजी या विषयांच्या अध्यापनावर सर्वाधिक भर

- केवळ चारच तासिका घ्यायच्या आहेत

- जर एका वर्गातील विद्यार्थी संख्या जास्त असेल तर आज अर्धे आणि उद्या अर्धे असे विद्यार्थ्यांचे नियोजन करायचे आहे.

अॅक्शन प्लाननुसार तयारी

शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या अॅक्शन प्लान नुसार मनपाच्या आरोग्य विभागाची तयारी झालेली आहे. १६ बुथ आम्ही केले असून, काही शिक्षकांची स्वत: वैयक्तिकरित्या येवून पंधरा ते वीस जणांनी तपासणी केली आहे. उद्यापासून याची सुरुवात होईल. शहरातील ज्या मोठ्या शाळा आहेत जिथे स्टाफची संख्या जास्त आहेत अशा नाथव्हॅली आणि स.भु. येथे आम्ही कँम्प लावणार आहोत. बाकी सुविधा ही नियोजित केंद्रांवर असले. डॉ.नीता पाडळकर मनपा आरोग्य अधिकारी

अशी आहे आकडेवारी

जिल्ह्यातील शासकीय, मनपा, जिल्हा परीषद, नपा, खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अशा सर्व माध्यमांच्या नववी ते बारावी पर्यंतच्या १ हजार ७८६ शाळा, ४३७ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. ज्यापैकी शहरात ३५४४ ९ ते १२ शाळा असून,१७ मनपाच्या माध्यमिक शाळांचा समावेश आहे. जिल्हयात एकूण १० हजार ४१४ शिक्षक आहेत. तर विद्यार्थी संख्या ही २ लाख ७४ हजार ३९५ आहे. आमची तयारी झाली आहे. फक्त आर्थिक बाजू अडचणी आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये अंमलबजावणी कशी होईल याबाबत शंका वाटते. शिवाय पालकांचे समुपदेशन करणे देखील शाळांसाठी आवाहन असणार आहे. विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही काळजी घेत आहोत. आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांना कोरोना तपासणी करण्यासाठी सांगितले आहे. विजय पाटौदी पी.यु. जैन शाळा मुख्याध्यापक

बातम्या आणखी आहेत...