आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपलब्ध:शहरात आजपासून कोरोना तपासणी ; मनपाकडे 3 लाख 50 हजार अॉटिजन किटचा साठा उपलब्ध

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असून चौथी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. यावर वेळीच मात करण्यासाठी राज्य आरोग्य विभागाने औरंगाबाद मनपाला सतर्कतेचा इशारा देत तपासण्या वाढवण्याची सूचना केली आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मनपा आरोग्य विभाग मंगळवारपासून आणखी ४ नवीन कोरोना तपासणी केंद्रे सुरू करणार आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत औरंगाबादेत गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा केंद्र व राज्य सरकारच्या विशेष पथकांनी औरंगाबादेत पाहणी करत विविध उपाययोजना राबवण्याची सूचना केल्यानंतर प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे रुग्णसंख्या आटोक्यात आली. तिसऱ्या लाटेने राज्यभरात कमी नुकसान झाले. मात्र, आता चौथी लाट जूनअखेर येण्याचे संकेत मिळत आहेत. औरंगाबादेत रविवारी तीन रुग्ण आढळले. उदय कॉलनी समर्थनगर, हर्सूल कारागृहातील एका कैद्याला कोरोनाची लागण झाली आहे. शहरात संक्रमण फारसे दिसून येत नसले तरी प्रशासन सर्व खबरदारी घेत आहे. जूनअखेरीस रुग्णसंख्या वाढेल, असे डॉ. मंडलेचा म्हणाले. सध्या शहरात ६ ठिकाणी तपासणी केली जाते. आता आणखी ४ नवीन तपासणी केंद्रे सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लसींचा साठा मुबलक प्रमाणात मनपाकडे कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा मुबलक प्रमाणात पडून आहे. या साठ्याची मुदत संपण्यासाठी बराच अवधी शिल्लक आहे. आजपर्यंत १८ वर्षांवरील १६ लाख ५६ हजार नागरिकांना पहिला, दुसरा आणि बूस्टर डोस दिला. १५ ते १७ वयोगटातील मुलांना ७७ हजार ८५५ डोस दिले. १२ ते १४ वयोगटातील मुलांना २६ हजार ९०९ डोस दिले. तसेच शाळा सुरू होताच १२ ते १४ वयोगटातील राहिलेल्या शालेय मुलांना डोस देणार असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...