आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:812 गावात कोरोना बाधित नाही- गावे सुरक्षित रहावित म्हणून ग्रादक्षता समितीची मदत

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो. - Divya Marathi
फाइल फोटो.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, शहरातील एकही भाग कोरोनापासून मुक्त राहिलेला नाही. ग्रामीण भागातही रुग्ण संख्या वाढते आहे. परंतु अजूही औरंगाबाद जिल्हयातील ८१२ गावे अशी आहेत जिथे कोरोना बाधित एकही रुग्ण नाही. अशी माहिती औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.सुनील भोकरे यांनी दिली.

देशभरासह आता महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढतो आहे. मागील वर्षी शहरातच रुग्ण मोठ्या प्रमाणात होते. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने लोक शहरातून गावाकडे जात होती. आता तर जिथे कोरोना नाही. अशा परदेशातील आणि मालदिव सारख्या ठिकाणी लोक पर्यटन करत आहेत. परंतु शहर असो वा गाव सर्वत्र सद्यस्थितीत कोरोना बाधितांचा आकडा धक्का देणारा आहे. तर मृत्यूचा दर देखील वाढतो आहे. परंतु या सर्व परिस्थितीत दिलासा देणारी बाब म्हणजे औरंगाबाद जिल्हयातील ८१२ गावे अशी आहेत. जिथे कोरोना बाधित नाहीत. ही गावे छोटी आणि कमी लोकसंख्या असलेली असल्याने गर्दी नाही जास्त लोकांशी संपर्क नसल्याने सुरक्षित असल्याचे जि.प. प्रशासनाने म्हटले आहे. कोरोना रुग्ण आढळून आलेली एकूण गावे ९९५ आहेत. तर सध्या अॅक्टीव्ह रुग्ण असलेल्या गावांची एकूण संख्या ६०४ आहेत. तर ८१२ गावात कोरोना बाधित रुग्ण नाहीत. कोरोना बाधितांची संख्या शहरासह यंदा ग्रामीण भागात देखील वाढली आहेत. परंतु दिलासा देणारी बाब म्हणजे औरंगाबाद जिल्हयातील ८१२ गावे अशी आहेत. जिथे कोरोना बाधित सध्या नाहीत. याचे कारण म्हणजे ही गावे दुर्गम भागात असून, लोकसंख्या कमी आहे. गर्दी नाही संपर्क जास्त नसल्याने सुरक्षित आहेत. या गावांमध्ये सुरक्षितता असावी या दृष्टीने ग्रामदक्षता समितीच्या माध्यमातून माहिती घेण्याबरोबरच जनजागृतीचे काम देखील करण्यात येत आहे.- डॉ.सुनील भोकरे उपमुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. पंचायत विभाग

बातम्या आणखी आहेत...