आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद कोरोना:औरंगाबादेत कोरोना बाधीतांच्या संख्येत 6 ने वाढ, शहरातील रुग्णांचा आकडा 297 वर; एका पत्रकारालाही लागण

औरंगाबाद2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • एका आठवड्यात तब्बल २२९ रुग्णांची वाढ, आतापर्यंत 25 रुग्ण घरी परतले

औरंगाबाद शहरात कोरोनाचा विळखा वाढतच चालला आहे. सोमवारी सकाळी 9 रुग्णांची नोंद झाली होती, त्यानंतर आता अजून 6 रुग्ण वाढल्याने रुग्ण संख्या आता 297 वर पोहोचली आहे. यामध्ये संजयनगर मधील 4, किलेअर्क भागातील 2, एन-11 मधील 1, जयभीमनगर येथील 3 पुंडलिक नगर येथील 2 नंदनवन कॉलोनीतील 1 देवळाई येथील 1 चिकलठाणा सावित्री नगर येथील 1 रुग्ण आहे.

दहावा बळी 

दरम्यान औरंगाबादमध्ये आज कोरोनामुळे दहावा बळी गेला. बीड बायपास येथील 55 वर्षाच्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हा रुग्ण घाटीत आला तेव्हा गंभीर अवस्थेत होता. 3 मे रोजी रात्री 11 वाजता त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती मेडिसीन विभाग प्रमुख मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिली आहे.

पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह

शहरातील एका पत्रकाराला कोरोनाची लागण झाली आहे. काल दुपारपासून ताप, डोकेदुखीचा त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 

गेल्या रविवारपर्यंत ५३ रुग्ण असलेल्या औरंगाबादेत आठच दिवसांत संख्या २८२ वर गेली होती. एका आठवड्यात तब्बल २२९ रुग्ण वाढले. रविवारी एकाच दिवशी २६ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील लाेकांच्या तपासण्या वाढल्याने ही वाढ झाली. दिलासादायक बाब म्हणजे पाॅझिटिव्ह ब्रदरच्या संपर्कात आलेले घाटीतील १२३ डाॅक्टर व परिचारिकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवारी इंदिरानगर, बायजीपुरा (१), मुकुंदवाडी (१६), संजयनगर (५), गुलाबवाडी जयभीमनगर (३) येथे नवे रुग्ण सापडले. बायजीपुरा येथील १५ वर्षीय रुग्णाचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत २५ रुग्ण घरी परतले आहेत.

बातम्या आणखी आहेत...