आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:औरंगाबादमध्ये कोरोनाचा स्फोट, आज 99 रुग्ण आढळले; एसआरपीच्या 72 जवानांना लागण, एकूण रुग्णसंख्या 477

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • मराठवाडा : इतर जिल्ह्यांत एकही नवीन रुग्ण नाही

औरंगाबाद जिल्ह्यात सकाळी 90 कोरोनाबाधित रुग्ण सापडेले होते, त्यानंतर सायंकाळी 9 जणसापडेल आहेत. यामध्ये एसआरपीएफ कॅम्प (72) जयभीम नगर (04), बेगमपुरा (04), भीमनगर, भावसिंगपुरा (01), शाह बाजार (01),  ध्यान नगर, गारखेडा (01),  एन-2 लघु वदन कॉलनी, मुकुंदवाडी (01), बायजीपुरा (03), कटकट गेट (01), सिकंदर पार्क (01) आहेत. तर ग्रामीण भागातील खुलताबाद (01) येथील आहेत. यामध्ये 83 पुरूष आणि सात महिला रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने (मिनी घाटी) सांगण्यात आले. यासोबत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 477 झाली आहे.

दरम्यान शहरात गुरुवारी २२ रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या ३७८ झाली आहे. रुग्णांत पाेलिस अधिकारी व पाेलिस कर्मचारी असलेल्या २ भावांचा समावेश आहे. शहरातील सर्वात वयाेवृद्ध रुग्ण ९५ वर्षीय महिलेचा गुरुवारी मृत्यू झाला. शहरातील हा काेराेनाचा १२ वा बळी आहे. आरेफ कॉलनीतील ही महिला २७ एप्रिल राेजी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. तिला श्वसनाचा, हृदयविकाराचा त्रास हाेता.

दरम्यान, २७ दिवसांपासून उपचार घेत असलेला ३८ वर्षीय रुग्ण गुरुवारी काेराेनामुक्त झाला. समतानगरातील हा पहिला रुग्ण आहे, त्याच्यापासून अनेकांना बाधा झाली हाेती. दुसरीकडे, मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांत एकही नवा रुग्ण आढळला नाही.

बातम्या आणखी आहेत...