आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा कहर:औरंगाबादेत 29, नांदेडला 27, तर परभणीत 20 जणांचा मृत्यू; नांदेडात 1859 रुग्ण, लातूरनंतर बीडमध्ये हजारावर पॉझिटिव्ह

नांदेड2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक ठिकाणी लसीकरणाला गती मिळेना

मराठवाड्यात कोरोनाने कहर केला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून विविध जिल्ह्यांत मृतांचा आकडाही उच्चांक गाठताना दिसत आहे. रविवारी नांदेडमध्ये सर्वाधिक १८५९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर लातूरमध्ये १६४७, औरंगाबाद १२८०, बीडमध्ये १०६२ रुग्ण सापडले. औरंगाबादमध्ये २९ जणांचा व नांदेडमध्ये २७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. परभणीतही मृतांचा आकडा २० वर पोहोचला असल्याने चिंता वाढली आहे.

पण लातूर जिल्ह्यात मात्र एक आठवड्यापासून रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने चिंता वाढली आहे. रविवारी जालना येथे ४९५, परभणीत ४०५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. जालन्यात ९ जणांचा मृत्यू झाला. तुलनेत हिंगोली जिल्ह्यात मराठवाड्यात सर्वात कमी म्हणजेच १३३ रुग्ण आढळले. येथे ५ जणांचा बळी गेला आहे. बीड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभागासमोरील डोकेदुखी वाढत आहे. नांदेडमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांचा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. येथे ६ हजार ६७९ जणांच्या तपासण्या करण्यात आल्या. यात ४ हजार ६६५ जाणांचा अहवाल निगेटिव्ह, तर १८५९ जण पाॅझिटिव्ह आहेत. परभणी जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढत असल्याने यावर प्रशासनाकडून चिंता व्यक्त होत आहे.

अनेक ठिकाणी लसीकरणाला गती मिळेना
मराठवाड्यात अनेक ठिकाणी लस उपलब्ध नसल्याने मोहिमेला हरताळ फासली गेली. जालन्यात रविवारी १९ केंद्रांवर १ हजार २३० लाभार्थींनी लस टोचून घेतली. यात ११६५ लाभार्थींनी पहिला, तर ६५ जणांनी दुसरा डोस घेतला. हिंगोलीत तर एक दिवस पुरेल एवढ्याच सुमारे दोन हजार लस शिल्लक आहेत. आज रविवार असल्यामुळे लसीकरण उत्सव झालाच नसल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. बीडमध्येही लस उपलब्ध नव्हती. नांदेडमध्ये मनपाच्या वतीने शहरातील दहा केंद्रांवर लसीकरण केले गेले.

बातम्या आणखी आहेत...