आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठवाड्यात कहर:नांदेडमध्ये 10, बीड 8, जालना 5, तर उस्मानाबादेत 6 रुग्ण, हिंगोलीत रुग्णसंख्या 100

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुधवारी हिंगोली व नांदेड जिल्ह्यांनी कोरोना रुग्णसंख्येचे शतक पूर्ण केले

बुधवारी हिंगोली व नांदेड जिल्ह्यांनी कोरोना रुग्णसंख्येचे शतक पूर्ण केले. हिंगोलीत नव्याने १ रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णसंख्या १०० झाली. नांदेडमध्ये मंगळवारी रात्री एकाच कुटुंबातील ६ जण, तर बुधवारी ४ नवे रुग्ण सापडले. जालना आणि बीडमध्ये अनुक्रमे ५ व ८ रुग्ण आढळले आहेत. लातूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. उस्मानाबादेतही बुधवारी ६ रुग्णांची भर पडली आहे.

मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत ६५ नव्या रुग्णांची नोंद

> नांदेड जिल्ह्यात मंगळवारी रात्री ६, तर बुधवारी सायंकाळी ४ असे एकूण १० नवीन रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्या ११० झाली. > बीडमध्ये ६७ नमुन्यांपैकी ८ अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे बीडची कोरोनाची संख्या २० इतकी झाली. > जालन्यातील खासगी रुग्णालयातील चौघांसह अंबड तालुक्यातील शिरनेरच्या एकाला संसर्ग झाला. जिल्ह्यातील रुग्णसंख्या ४१ वर गेली. > लातूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री ४ रुग्ण सापडले. हे सर्व रुग्ण बाहेर जिल्ह्यातून आले आहेत. > उस्मानाबादेत मंगळवारी रात्री ६ रुग्णांची भर पडली. हे रुग्ण नुकतेच पुणे-मंुबईतून आले होते. जिल्ह्यात रुग्णसंख्या १६ वर गेली आहे. > हिंगोलीत बुधवारी भिरडा येथील एक २३ वर्षीय तरुण पॉझिटिव्ह आला.

बातम्या आणखी आहेत...