आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:रुग्णालयातच कोरोना रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या, स्टाफने रुग्णाकडे वारंवार पैसे मागितल्याचा कुटुंबियांचा आरोप

रोहित देशपांडे(बीड)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रुग्णालय प्रशासनाने कुटुंबियांचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले

कोरोना संक्रमित रुग्णाने हॉस्पिटलमध्येच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे, रुग्ण आत्महत्या करत असताना घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासन काय झोपले होते का? असा सवाल उपस्थित होत आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोरोना संक्रमितांची संख्या वाढतच चालली आहे. संक्रमित व्यक्तीला धीर देण्यासाठी नातेवाईक आणि डॉक्टर दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत. त्यांना प्रत्येक वेळी भासू देत नाहीयेत, की ते कोरोना संक्रमित आहेत. त्यांना सामान्य रुग्णाप्रमाणे ट्रीटमेंट देऊन मनोबल उंचावत आहेत. पण, बीडमधील या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान, कुटुंबातील 35 वर्षीय तरुणाला गमावलेल्या कुंटुंबियांनी न्यायाची मागणी करत त्याचा मृतदेह घेण्यास नकार दिला आहे.

बीड शहरातील नामांकित दिप हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली. आत्महत्या केलेला तरुणाचे नाव रामलिंग महादेव सानप असे होते. हॉस्पिटल व्यवस्थापन बिलासंदर्भात रुग्णाला वारंवार विचारणा करत होते, त्यामुळेच माझ्या पतीने आत्महत्या केल्याचा आरोप मयत रामलिंग याच्या पत्नीने केला आहे. दरम्यान हॉस्पिटल प्रशासनाने नातेवाईकांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

बातम्या आणखी आहेत...