आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:कोरोनाबधित राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची घाटी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या, परिसरात खळबळ

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
काकासाहेब कणसे - Divya Marathi
काकासाहेब कणसे

औरंगाबाद येथील घाटीतील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या 42 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. रविवारी (आज) सकाळी आठच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. काकासाहेब कणसे असे रुग्णाचे नाव आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस होते.

मिळालेल्या माहितीनुसार,पैठण तालुक्यातील धनबाद येथील काकासाहेब कणसे यांच्यावर 21 सप्टेंबरपासून घाटी रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून कणसे यांनी उडी मारली. यामध्ये त्या रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती सुपेरस्पेशालिटीचे विशेष कार्याधिकारी सुधीर चौधरी यांनी दिली आहे. या घटनेने घाटी रुग्णालयात खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून पोलिस नातेवाईकांकडे चौकशी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...