आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
संजयनगर येथील ३४ वर्षीय रुग्णाने सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रविवारी दुपारी गोंधळ घातला. कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून जात त्याने आयव्ही स्टँड आणि स्टूल दरवाजावर आदळला. त्यामुळे दरवाजाची काच फुटली. त्याच्या विरोधात तक्रार करण्यात आल्याची माहिती सुपरस्पेशालिटीचे विशेष कार्याधिकारी सुधीर चौधरी यांनी दिली.
या रुग्णाला २७ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याची तब्येत स्थिर झाल्यानंतर वॉर्ड क्रमांक ३१ मध्ये ४ डिसेंबरला त्याला हलवण्यात आले. त्याला कोरोनाबरोबरच कावीळही झाला आहे. रविवारी दुपारी तीन वाजता त्याने अचानक गोंधळ घालायला सुरुवात केली. मला काहीही झालेले नाही, अशी बडबड करत तो कर्मचाऱ्यांच्या अंगावार धावून गेला. त्यानंतर त्याच्या वडिलांनाही रुग्णालयात बोलावण्यात आले. ते पीपीई किट घालून आत वॉर्डात आले व त्यांनी मुलाला समजावून सांगितले. या तरुणाच्या अशा वर्तनामुळे त्याच्यावर सायकिअॅट्रिक विभागातील डॉक्टरांनीही उपचार सुरू केल्याचे सुधीर चौधरी यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.