आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:कोरोनाने वाढवली कमालीची असुरक्षितता! एकच विचार सतत येत असल्याने वाढली भीती

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रविण देशपांडे
  • कॉपी लिंक
  • 4% असलेला आजार आता 15% वर

कोरोना जसजसा हातपाय पसरत होता तसे बारावीतला राजेश स्वत:च्या व कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी सतर्क झाला. बाहेरून आणलेली कुठलीही वस्तू निर्जंतुक करून घरात घेणे, दिवसातून ८ वेळा साबणाने हात धुणे, सॅनिटायझर लावणे असे प्रकार रोज सुरू होते. पण कालांतराने आठ वेळा हात धुण्याचा प्रकार ४० वर जाऊन पोहोचला. कॉलनीत कोरोनाचा रुग्ण सापडला म्हटलं की धडकी भरायला लागली. कशाची तरी अनामिक भीती वाटत होती. काळजीतून चिंतेपर्यंतचा राजेशच्या या प्रवासाचा अनुभव सध्या अनेक जण घेत आहेत. मानसशास्त्रीय भाषेत या आजाराला अनिवार्य विचार व अनिवार्य कृती (ऑबसेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डर) असे म्हणतात. पूर्वी एखाद्या व्यक्तीत हा आजार ४ टक्क्यांपर्यंत होता. तो सध्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक आढळतो. लॉकडाऊननंतर मात्र हे प्रमाण ३६ टक्क्यांपर्यंत वाढण्याची भीती मानसशास्त्रज्ञ डॉ. संदीप सिसोदे यांनी व्यक्त केली. तेे म्हणाले की, माणसाच्या मनात येणारे विचार नियंत्रणात असेपर्यंत धोका नाही. मात्र एकच एक प्रकारचे विचार सतत यायला लागले की ऑबसेशन वाढते व हा विचार कृतीसाठी भाग पाडतो.

उपाय : सतत एकसारखे विचार येत असतील तर त्याविरुद्ध कृती करा 
- गरज नसेल तेव्हा स्वच्छता पाळणे चुकीचे 
- कोरोनाबाबत त्याच त्याच विषयावर सतत चर्चा करू नये 
- सोशल मीडियावर जास्त वेळ घालवू नये 
- टीव्हीवरील अतिरेकी बातम्या पाहणे टाळावे 
- मनात जे विचार येतील त्याविषयी घरच्या लोकांशी बोलत राहा 
- कुटुंबीयांनीही विचार समजून घेऊन योग्य उपाय सुचवावा 
- व्यायाम, प्राणायाम, पायी फिरावे, रोज धावावे 
- आहार संतुलित असावा 
- मनात विचार येत असतील तेव्हा समुपदेशकाची मदत घ्या

काय आहेत दुष्परिणाम
- गरज नसताना हात धुणे, हाताचे सालटे निघेपर्यंत सॅनिटायझरचा वापर करणे 
- चिडचिडेपणा वाढणे, रोगप्रतिकारक्षमता कमी होणे 
- शरीरातील रसायनांचे असंतुलन होणे 
- शांत झोप न लागणे, सतत असुरक्षित वाटणे
- अॅसिडिटीेचा त्रास जाणवू लागणे 
- शरीरातील हिमोग्लोबिन कमी होणे.

पाच वर्षांपर्यंतच्या लहान मुलांमध्येही आजार
ओसीडीचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे. पूर्वी मोठ्यांमध्ये हा आजार दिसायचा पण आता पाच वर्षांच्या मुलापासून मोठ्यांपर्यंत सर्वजण याच्या विळख्यात आले आहेत. या आजारात काउन्सेलिंग व कॉग्निटिव्ह बिहेविअर थेरपीचा उपयोग होतो. - डॉ. संदीप सिसोदे, अध्यक्ष, राज्य मानसशास्त्र असोसिएशन.