आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावधगिरी:हिंगोली जिल्हयात दाखल झालेल्या गावकऱ्यांसाठी विलगीकरण कक्षाचा नवा फंडा, मुळ गावात न ठेवता शेजारच्या गावात ठेवले जाणार

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हयातील सर्वच गरोदर मातांचीही होणार प्रसुतीपूर्व कोरोना तपासणी

हिंगोली जिल्हयातील ग्रामीण भागात बाहेर जिल्हयातून दाखल झालेल्या गावकऱ्यांना थांबवण्यासाठी विलीगीकरणाचा नवा फंडा वापरला जाणार असून त्यांच्या मुळ गावात न ठेवता शेजारच्या गावातील विलगीकरण कक्षात ठेवण्याच्या सुचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या आहेत. त्यामुळे एका गावातील विलगीकरण कक्षात थांबणाऱ्या गावकऱ्यांवर स्थानिक गावकऱ्यांची नजर राहणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने गावकरी परत येऊ लागले आहेत. मुंबई, पुणे, नाशीक, औरंगाबाद या भागात कामासाठी गेलेले मजूर गावात येत असल्याने गावकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेषतः मुंबई येथून येणाऱ्या मजूरांमधून गावकऱ्यांना चांगलाच ताप झाला आहे. तर त्यांना गावातील विलगीकरण कक्षात ठेवल्यानंतरही ते रात्रीच्या वेळी गावात फिरत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होऊ लागल्या आहेत. प्रशासनाच्या सुचनांचे गांभीर्याने पालन होत नसल्याने संपूर्ण गावांनाच धोका निर्माण होऊ लागला आहे.

यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारी ता. १८ नव्याने आदेश काढले आहेत. यामध्ये बाहेरगावाहून येणाऱ्या गावकऱ्यांना शासकिय विलगीकरण कक्षातच ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत. या शिवाय त्या ठिकाणी भौतिक सुविधा उपलब्ध कराव्यात, त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी अशा सुचनाही दिल्या आहेत. या शिवाय त्यांना त्यांच्या मुळ गावातील विलगीकरण कक्षात न ठेवता शेजारच्या गावातील विलगीकरण कक्षात ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे एका गावातील कक्षात दुसऱ्या गावातील गावकरी थांबणार असल्याने स्थानिक गावकऱ्यांचे विलगीकरण कक्षाकडे कडे लक्ष राहणार अाहे. बाहेर फिरणाऱ्यांना स्थानिक गावकरीच मज्जाव करणार आहेत. त्यामुळे बाहेरून आलेल्यांची वेळोवेळी तपासणी होईल शिवाय स्थानिक गावकऱ्यांनाही धोका होणार नसल्याचे बोलले जात आहे.

गरोदर मातांचीही होणारा प्रसुतीपूर्व कोरोना तपासणी

जिल्हयातील सर्वच गरोदर मातांची प्रसुतीपूूर्व कोरोना तपासणी करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. प्रसुतीच्या शेवटच्या आठवड्यात सदर तपासणी करावी. तसेच खाजगी रुग्णालयात ताप, खोकला आदी लक्षणे असलेल्या रुग्णांची कोरोनाची तपासणी करण्याची शिफारस केल्यास त्या रुग्णांची विनामुल्य तपासणी करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी जयवंशी यांनी दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...