आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद कोरोना:औरंगाबादेत आज 22 नवीन रुग्ण आढळले: रुग्णसंख्या 378 वर; शहरात 12 वा बळी, 95 वर्षीय महिलेचा मृत्यू

औरंगाबाद2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • बुधवारी नर्ससह ३५ जण पाॅझिटिव्ह आढळले, काेराेनावर मात करणाऱ्या शहरातील रुग्णांची संख्या २८

कोरोनामुळे औरंगाबादमध्ये 12 वा बळी गेला. आरिफ कॉलनीतील 95 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला 27 तारखेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेला उच्च रक्तदाब आणि श्वसनाचा तीव्र त्रास होता. दरम्यान जिल्हा रुग्णालयातील हा पहिला मृत्यू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक सूंदर कुलकर्णी यांनी दिली आहे.

औरंगाबाद शहरात गुरुवारी सकाळी आणखी 17 नवीन रुग्ण वाढले. यामध्ये जयभीम नगर 2, किलेआर्क 2, पुंडलिक नगर 5, हक टॉवर 5, कटकट गेट 3 या रुग्णांचा समावेश आहे. त्यानंतर, सायंकाळी आणखी 5 रुग्णांची नोंद करण्यात आली. यातपुंडलीक नगरमधील 4 तर जयभीम नगरमधील 1 रुग्णाचा समावेश.

 काल शहरातील 34 व ग्रामीण भागातील एक असे 35 काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले. एकूण बाधितांचा आकडा 373 झाला आहे. बुधवारी जयभीमनगरात ७, कबाडीपुऱ्यात ५, दत्तनगर- कैलासनगर ४, बायजीपुरा ५, संजयनगर, मुकुंदवाडी ७, पुंडलिकनगर ३, बेगमपुरा १, रेल्वेस्टेशन परिसर १, कबीरनगर, उस्मानपुरा आणि सातारा रोड परिसरात १ रुग्ण आढळला. यात बजाजनगरातील एका नर्सचाही समावेश आहे. दरम्यान, ३ रुग्णांचे दुसऱ्या चाचणीचे अहवालही निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना बुधवारी डिस्चार्ज मिळाला. आता काेराेनावर मात करणाऱ्या शहरातील रुग्णांची संख्या २८ झाली आहे, तर आजवर ११ जणांचा बळी गेला आहे.

मराठवाडा : पाच जिल्ह्यांत नवा रुग्ण नाही

नांदेड येथील अबचलनगर येथील ५७ वर्षीय कोरोना रुग्णाचा बुधवारी सकाळी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना वाटेतच मृत्यू झाला. लातुरात ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमध्ये बुधवारी एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. तथापि, काही ठिकाणचे अहवाल येणे बाकी असल्याने धाकधूक मात्र कायम आहे. उस्मानाबाद, बीड, परभणी या जिल्ह्यांत एकही अॅक्टिव्ह रुग्ण नाही.

बातम्या आणखी आहेत...