आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद कोरोना:औरंगाबादेत आज 30 रुग्णांची नोंद, तर दोघांचा मृत्यू; मृतांचा आकडा 48 वर

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीडमध्ये स्वॅब घेतल्याच्या काही तासांतच एकाचा मृत्यू; जालना ८, लातूर ५, उस्मानाबादेत ३ बाधित

औरंगाबादेत कोरोनामुळे आज आणखी दोघांचा बळी गेला. किराडपुरा (75) आणि सिटी चौक (72) या दोन्ही पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.कोरोनामुळे मरणाऱ्याची संख्या 48 झाली आहे. यामध्ये सिटीचौक मधील 72 वर्षीय रुग्णाचा सकाळी पाच वाजता तर किरडपुरा येथील रुग्णाचा शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता झाला आहे 

औरंगाबाद जिल्ह्यात आजदिवसभरात 25 रुग्ण आढळले आहेत. यासोबत जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1248 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. 

औरंगाबादमध्ये आज सकाळी आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे : सादाफ नगर(१), रेहमानिया कॉलनी (१), महेमूदपुरा(१),  औरंगपुरा (१),  एन-८ (१), एन-४, गणेश नगर (१), ठाकरे नगर, एन-२ (२), न्याय नगर (३), बायजीपुरा (१), पुंडलिक नगर (२), बजरंग चौक, एन-७ (३), एमजीएम परिसर (१), एन-५ सिडको (१), एन १२, हडको (१) पहाडसिंगपुरा (१), भवानी नगर (१), वडगाव कोल्हाटी (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये सहा महिला आणि १७ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.

शुक्रवारी मराठवाड्यात शुक्रवारी कोरोनाचे ४८ नवीन रुग्ण सापडले. जालना जिल्ह्यामध्ये शुक्रवारी ८, लातूर जिल्ह्यात ५, तर उस्मानाबादेत कोरोनाचे ३ नवीन रुग्ण आढळून आले. बीड जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी कोरोना संशयित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


औरंगाबाद : चार रुग्णांचा मृत्यू

औरंगाबाद शहरातील रुग्णसंख्या शुक्रवारी ३२ने वाढली. एकूण रुग्णसंख्या १२१८ वर पाेहाेचली आहे. यात एका महिला पाेलिस कर्मचाऱ्यासह १४ महिला व १८ पुरुषांचा समावेश आहे. घाटी रुग्णालयात चार काेराेनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. यात दाेन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या ४५ वर गेली आहे. शहरातील कोरोनाबाधित वसाहतींची संख्या १२१ झाली आहे.

बीडमध्ये स्वॅब घेतल्याच्या काही तासांतच एकाचा मृत्यू, जालना ८, लातूर ५, उस्मानाबादेत ३ बाधित

बीड | जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील मातकुळी गावातील मृत २० वर्षीय तरुणाचा स्वॅब घेतल्यानंतर काही तासांतच मृत्यू झाला. त्याला मागील तीन दिवसांपासून त्रास होत होता.

जालना :

शुक्रवारी एक एसआरपी जवानासह ८ पॉझिटिव्ह आढळले. यात एका १३ वर्षीय मुलासह खासगी हॉस्पिटलमधील तिघांचा समावेश आहे. तसेच एक रुग्ण मंठा तालुक्यातील आहे.

लातूर : 

शुक्रवारी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. एक रुग्ण लातुरातील लेबर कॉलनी परिसरात सापडला. हा शहरातील पहिलाच रुग्ण आहे.

उस्मानाबाद : 

परंडा तालुक्यातील कुकडगाव, कळंब तालुक्यातील आथर्डीसह वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील सून आणि सासऱ्याला काेरोनाचा संसर्ग झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...