आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूनंतरही मृतदेहांचा प्रवास थांबेना:रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल झाल्याने लातुरात दफन केलेला मृतदेह काढला बाहेर

लातूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नातेवाइकांनी पडताळणी न करता गुरुवारी सकाळी त्यांचा मृतदेह गावाकडे आणून शेतात दफनविधी केला.

कोरोनामुळे आप्तांना गमावलेल्या नातेवाइकांवर आधीच दु:खाचा डाेंगर काेसळलेला असतो. त्यातच लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या गलथान कारभारामुळे दोन कुटुंबांना मनस्ताप सहन करावा लागला. मृतदेहांची अदलाबदल झाल्याने दफनविधी झालेला मृतदेह बाहेर काढून नंतर मूळ गावी नेऊन अंत्यसंस्कार करावे लागले. चाकूर तालुक्यातील शेळगाव येथील धोंडिराम तोंडारे (६५) यांना काेरोना उपचारासाठी उदगीर येथे दाखल केले होते. ५ मे रोजी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. नातेवाइकांनी पडताळणी न करता गुरुवारी सकाळी त्यांचा मृतदेह गावाकडे आणून शेतात दफनविधी केला. याचदरम्यान हातोला (ता. अंबाजोगाई) येथील आबासाहेब सखाराम चव्हाण (४५) यांचेही कोरोनाने निधन झाले होते.

वैद्यकीय महाविद्यालयाकडून शेळगावच्या तोंडारे यांच्या नातेवाइकांकडे चव्हाण यांचा मृतदेह देण्यात आला. गुरुवारी सकाळी हातोला येथील चव्हाण यांचे नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी लातूरला गेल्यानंतर त्यांना हे लक्षात आले. यानंतर नातेवाइक तोंडारे यांचा मृतदेह सोबत घेऊन शेळगाव येथे आले. त्यांनी तोंडारे यांच्या नातेवाइकांशी चर्चा करून दफन केलेला मृतदेह काढून घेतला व अंत्यसंस्कार झाले. दरम्यान, हा घोटाळा रुग्णांच्या नातेवाइकांमुळेच घडल्याचे रुग्णालयाने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...