आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमा कवच:कोरोना वॉरियर शिक्षकांचे विमा कवच सहा महिन्यांपूर्वीच संपले, नूतनीकरणाकडे दुर्लक्ष

औरंगाबाद12 दिवसांपूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे सेवा बजावणाऱ्या राज्यातील सुमारे ७.५ लाख शिक्षकांचे विमा कवच गतवर्षी सप्टेंबरमध्येच संपले आहे. शिक्षक हे फ्रंटलाइन वॉरियर असूनही त्याचे नूतनीकरण झालेले नाही. यामुळेच सेवा बजावताना सप्टेंबरनंतर मृत्युमुखी पडलेल्या ६८ शिक्षकांचे कुटुंबीय मदतीपासून वंचित आहेत.

राज्यातील शिक्षक मार्च २०२० पासून घरोघरी सर्वेक्षण, रेशन दुकानांची पाहणी, नाक्यावर चौकशी, वाहनांची तपासणी, कोविड केंद्रांवर तपासणी अधिकारी आणि आता कोरोना लसीकरण केंद्रावर नोंदणी अधिकारी म्हणून शिक्षक काम करताहेत. फ्रंटलाइन वॉरियर्स असल्याने यादरम्यान मृत्यू झाल्यास त्यांना ५० लाखांचा विमा लागू करण्यात आला होता. याची मुदत ३० सप्टेंबरला संपली आहे. कोराेनाशी संबंधित सेवा देताना १ ऑक्टोबर ते ३१ मार्च २०२१ पर्यंत ६८ शिक्षकांचा मृत्यू झाला. मात्र, विमा कवच संपल्याने त्यांच्या कुटुंबीयांना याचे लाभ मिळाले नसल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष विजय साळकर यांनी दिली. केंद्राच्या धर्तीवर विम्याचे नूतनीकरण करून कुटुंबीयांना विम्याचे लाभ देण्याची मागणी साळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

प्रस्ताव मागवले पण... : जानेवारीमध्ये शासनाने सरकारी कर्मचारी व जिल्हा परिषदेच्या गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांचे विमा प्रस्ताव मंजूर केले. शिक्षकांना यात वगळण्यात आले. त्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मृत्यू झालेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विम्याचा लाभ देण्याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. त्यावर कारवाई झाली नसल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस रणजित राठोड, सतीश कोळी यांनी दिली.

सर्वाधिक मृत्यू धुळे जिल्ह्यात
कोरोनासंबंधी सेवा बजावताना शिक्षकांचे सर्वाधिक १२ मृत्यू धुळे जिल्ह्यात झाले. त्यापाठोपाठ अहमदनगर ३, अमरावती २, औरंगाबाद ४, बीड १, चंद्रपूर २, गडचिरोली १, गोंदिया ३, जळगाव ८, कोल्हापूर ३, नागपूर ४, नांदेड ४, नंदुरबार ५, नाशिक १, परभणी ३, पुणे ३, सोलापूर ३, ठाणे २, उस्मानाबाद १, वर्धा ३, यवतमाळ ४, तर रत्नागिरीमध्ये एका शिक्षकाचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...