आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानाचा मुजरा:क्रांती चौकात राज्याभिषेक दिन साजरा ; जाधववाडीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासही दुग्धाभिषेक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाच्या वतीने सोमवारी सकाळी १०:३० वाजता शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दुग्धाभिषेक करण्यात आला. या वेळी बाजार समितीचे मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे, प्रशासक मुरलीधर चौधरी, प्रकाश जाधव, अशोक शिंदे, शेख मोहंमद शेख चाँद, मो.अबू सुफियान, मो. गयास बागवान, गणेश कडुबा नवले, सचिव व्ही. ए. शिरसाठ आदी उपस्थित होते. विविध घोषणांनी दणाणला क्रांती चौक परिसर : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीस दुग्धाभिषेक करून राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. या वेळी जय भवानी, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, असा जयघोष करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. शिव मावळ्यांनी हातात शिवध्वज व गळ्यात भगवा रुमाल घातल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले. मनपाला शिवराज्याभिषेक सोहळ्याचा विसर : महापालिका प्रशासनाला शिवराज्याभिषेक सोहळ्याचा विसर पडला. एवढेच नव्हे तर शिवजयंतीदिनी जे पुष्पहार अर्पण केले, ते हार वाळून काळे पडले आहेत. मनपाने अद्याप ते काढण्याची साधी तसदी घेतली नाही. याचा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात आला. मनपा प्रशासकांकडून ही अपेक्षा नाही. त्यांनी त्वरित याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...