आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद महापालिका निवडणुकीला अखेर मुहूर्त:प्रभाग रचनेचे काम आजपासून सुरू, ऑक्टोबरमध्ये मतदान होण्याची शक्यता

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या औरंगाबाद महापालिकेच्या निवडणूक कामकाजाला गुरुवारी, 2 जूनला सुरुवात झाली. सध्या प्रभाग रचनेच्या अंतिम कामाला सुरुवात झाली असून, आराखडा प्रसिद्ध करणे सूचना हरकती मागवणे आणि अंतिम सुनावणी या सगळ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने ही निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात निवडणूक प्रभागांच्या सीमांची प्रसिध्दी, हरकती व सूचना मागविणे, सुनावणी देणे इत्यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. या प्रभाग रचनेच्या कामकाजाला जलदप्रमाणे सुरुवात झाली आहे. त्याप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात महापालिकेची निवडणूक निश्चित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

02 जून 2022

निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिध्द करणे व त्यास प्रसिध्दी देणे.

02 ते 16 जून 2022

प्रारूप अधिसूचनेवर हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी.

17 जून

निवडणूक आयोगास सादर करणे राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यामार्फत हरकती व सूचनांवर सुनावणी देण्याचा अंतिम दिनांक.

24 जून 2022 पर्यंत (शुक्रवार)

राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यामार्फत हरकती व सूचनांवर सुनावणी देण्याचा अंतिम दिनांक.

30 जून 2022

सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशीला विहीत नमुन्यात नमूद करुन विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास पाठविण्याचा दिनांक.

बातम्या आणखी आहेत...