आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपट्टी:50% पाणीपट्टी माफीला अखेर मनपाचीही मंजुरीऔरंगाबाद

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात २३ मे रोजी जलआक्रोश मोर्चा काढण्याचे भाजपने जाहीर केले. त्याची हवा काढण्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबादची ५० टक्के पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय १३ मे रोजी जाहीर केला. शिवसेनेचे माजी सभापती राजू वैद्य यांनी त्यापूर्वी तशी मागणी केली होती. मात्र पालकमंत्र्यांच्या मंजुरीनंतर २६ दिवसांनी व मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या एक दिवस आधी मनपा प्रशासकांनी एक परिपत्रक जारी केले. त्यानुसार अतिरिक्त आयुक्तांच्या नेतृत्वातील समितीने ५० % पाणीपट्टी माफीला अधिकृत मंजुरी दिली. तसेच मालमत्ता करासोबतच पाणीपट्टीचे बिल द्यावे, असा अहवाल दिला. त्यामुळे चालू आर्थिक वर्षापासून ५० टक्के पाणीपट्टी माफीचा लाभ नागरिकांना मिळणार आहे.

नवे दर असे अर्धा इंच ‌~२०२५ पाऊण इंच ३२०० १ इंच ७,४५० १.५ इंच ३२,६२५ २ इंच ५४,३५० ३ इंच ८६,९७५ ४ इंच १,३०,४५० ६ इंच २,१७,४२५ ८ इंच ३,२६,१५०

बातम्या आणखी आहेत...