आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाय सुरू:हिवताप रोखण्यासाठी मनपाचे प्रतिबंधात्मक उपाय सुरू ; डॉ. पारस मंडलेचा यांच्या हस्ते मोहिमेला सुरुवात

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाच्या मलेरिया विभागामार्फत हिवताप प्रतिरोध महिना व मान्सूनपूर्व डास प्रतिबंधात्मक मोहीम सुरू करण्यात आली आहे. १० जून रोजी झोन क्रमांक-१ मधील खडकेश्वर महादेव मंदिर येथून वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या हस्ते मोहिमेला सुरुवात झाली. भावासिंगपुरा, भीमनगर, पडेगाव येथील अति जोखमीच्या विभागात अॅबेटिंग, स्प्रेइंग, हस्तपत्रिका वाटप, आरोग्य शिक्षणाद्वारे नागरिकांमध्ये जनजागरण करण्याचे आदेश दिले. यावेळी जीवशास्त्र विभागाच्या डॉ. अर्चना राणे, झोनल मुख्य पर्यवेक्षक बघडाणे, के. बी. मोरे, झोनल पर्यवेक्षक गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...