आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएसई शाळा:मनपाच्या नवीन तीन सीबीएसई शाळा सुरू ; प्रियदर्शिनी, एन-7 सिडको, चेलीपुऱ्यात शाळा

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे १३ जूनपासून सीबीएसई शाळांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. मागच्या वर्षी गारखेडा व उस्मानपुरा शाळेत सीबीएसईचे वर्ग सुरू झाले. आता या वर्षी नवीन तीन ठिकाणी सीबीएसई शाळा सुरू केल्या जात आहेत. प्रियदर्शिनी विद्यालय, मयूरबन कॉलनी शाळा एन-७ सिडको व शहागंजमधील चेलीपुरा येथे नवीन सीबीएसई शाळा सुरू केली जात आहे. या तिन्ही शाळांच्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे. याविषयी विभागप्रमुख तथा उपायुक्त नंदा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. याप्रसंगी शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, समग्र शिक्षा अभियान कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे, सीबीएसई शाळेचे समन्वयक शशिकांत उबाळे, मुख्याध्यापिका संगीता ताजवे व रशिदउन्निसा यांची उपस्थिती होती. नवीन तीन सीबीएसई शाळांत ज्युनियर केजी व सीनियर केजीसाठी प्रवेश दिले जाणार आहेत. या प्रवेशासाठीचेे रजिस्ट्रेशन फॉर्म सोमवारी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत उपलब्ध राहतील. सीबीएसईचे वर्ग सुरू होणाऱ्या शाळांत प्रवेश घेऊन इच्छिणाऱ्यांचे भाऊ किंवा बहीण त्या शाळेत आधीच शिक्षण घेत असल्यास त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच परितक्ता, एकल पालक स्त्री व सैनिकांचे पाल्य, पालिकेतील वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...