आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानुग्रह साहाय्य:कोरोना मदतीसाठी बँक अर्ज दुरुस्त करा ; संगणकीय प्रणालीमध्ये बँक खात्याची चुकीची नोंद

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे मृत व्यक्तींच्या नातेवाइकास ५०००० रुपयांचे सानुग्रह साहाय्य देण्यात येत आहे. त्यासाठी त्यांनी पोर्टलवर अर्ज केले. मात्र, काहीना ते अनुदान मिळालेले नाही. अशा अर्जदारांनी बँक खात्याचा तपशील चुकीचा भरल्याने अथवा संगणकीय प्रणालीमध्ये बँक खात्याची चुकीची नोंद झाल्याने अशा काही पात्र अर्जदारांच्या बँक खात्यात रक्कमजमा झालेली नाही. त्यामुळे या त्रुटी दुरुस्त करून पुन्हा पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबत अशा अर्जदारांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन निवासी जिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...