आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापसाचा वायदे बाजार 13 पासून सुरू होणार:तर खासदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन : घनवट

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रजासत्ताकदिनी शेतकरी संघटनेने मुंबईत सेबीच्या कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनास यश आले आहे. १३ फेब्रुवारीपासून कापसाचा वायदे बाजार सुरू होणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिव्य मराठीला दिली. वायदे बाजार सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यातील कापसाचे भाव कळतील व नियोजनास मदत होईल.

कापसासह इतर सात पिकांवर एक वर्षाची वायदेबंदी घालण्यात आली होती. त्यामध्ये गहू, तांदूळ, मोहरी, सोयाबीन, मूग,चणा, पामतेलवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचा परिणाम शेतमालाचे भाव पडले होते. त्यामुळे शेतकरी संघटनेेने तब्बल तीन तास सेबीच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा केल्यानंतर कापसाचे वायदे बाजार तेरा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे कापसाच्या भाववाढीची प्रतीक्षा जे शेतकरी करीत आहेत त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्या वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सेबीच्या अधिकाऱ्यांसोबत तीन तास चर्चा केली होती. त्यानंतर त्याचे पत्रदेखील मिळाले आहे.

इतर पिकांवरील बंदी येत्या २ महिन्यांत हटवावी शेतमालाच्या वायदे बाजाराचा प्रश्न खासदारांनी मांडणे अपेक्षित आहे. येत्या दोन महिन्यांत सेबीने त्यांनी इतर सात पिकांच्या वायदे बाजाराची बंदी हटवली नाही तर खासदारांच्या घरासमोर आंदोेलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...