आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाणिज्य परिषद:विद्यापीठात डिसेंबरअखेर वाणिज्य परिषद ; प्रा. डॉ. वाल्मीक सरवदे यांची महासचिव तथा मुख्य आयोजक म्हणून निवड

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

७३ व्या भारतीय वाणिज्य परिषदेचे आयोजन यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात केले जाणार आहे. परिषदेचे सचिव डॉ. पुष्पेंद्र मिश्रा यांचे (११ जून) कुलगुरू प्रोफेसर डॉ. प्रमोद येवले यांना पत्र प्राप्त झाले आहे. परिषदेसाठी प्रा. डॉ. वाल्मीक सरवदे यांची महासचिव तथा मुख्य आयोजक म्हणून निवड झाली आहे. डिसेंबर अखेरीस परिषद होणार आहे. लखनऊ येथील डॉ. पुष्पेंद्र मिश्रा, दिल्ली येथील डॉ. नवल किशोर, इंदूर येथील डॉ. रमेश मंगल व प्रा. डॉ. अरविंद कुमार यांच्या समितीने विद्यापीठातील पायाभूत सुविधांची एप्रिल-२०२२ दरम्यान पाहणी केली होती. आता विद्यापीठात परिषद घेण्यास मान्यता दिली आहे. २५ वर्षांनंतर विद्यापीठाला या परिषदेच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. देश-विदेशातून चार हजार प्रतिनिधी परिषदेत सहभागी होणार आहेत. कुलगुरू डॉ. येवले यांच्या अध्यक्षतेत नुकतीच आ‌ढावा बैठक झाली आहे. यावेळी दहा वेगवेगळ्या समित्यांचे गठण केले आहे. त्याशिवाय डॉ. सय्यद अझहरुद्दीन, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. के. एल. साळवे, प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, प्राचार्य डॉ. एच. जी. विधाते, डॉ. सत्यप्रेम घुमरे, डॉ. फराह नाज गौरी, प्राध्यापक डॉ. विना हुंबे, डॉ. सुखदेव मानटे, डॉ. अभिजित शेळके, डॉ. भारती गवळी, डॉ. राजेश रागडे, डॉ. माधुरी सावंत, डॉ. एस. डी. तळेकर, डॉ. एम. एस. वाघमारे यांच्या अध्यक्षतेतही समित्यांचे गठण केले आहे. माजी अध्यक्ष प्राचार्य डॉ. बबन तायवाडे, डॉ. टी. यू. शिवारे यासाठी सहकार्य करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...