आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळीत प्रकरण:विद्यार्थ्यां‌ची मानसिकता ओळखून समुपदेशन करणार : कुलगुरू

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक समस्या जाणून घेऊन त्यातून मार्ग काढा, त्यांची मानसिकता ओळखून त्यांच्याशी संवाद वाढवा, त्यांच्या वर्तणुकीत बदल आढळल्यास त्वरित माहिती घेऊन चर्चा करा, अशा सूचना सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आणि महाविद्यालयांना करणार असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी बुधवारी दिली.

शासकीय विज्ञान संस्थेत संशोधक विद्यार्थी-विद्यार्थिनीच्या जळीत प्रकरणानंतर ‘विद्यार्थी-शिक्षक संवाद आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत होणारे बदल’ हा विषय चर्चेत आला आहे. डॉ. येवले म्हणाले, विद्यापीठाच्या प्रत्येक विभागातील संशोधक विद्यार्थ्यांचे, पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांचे आठ-दहा दिवसांत मानसोपचारतज्ज्ञ समुपदेशकांद्वारे तसेच मार्गदर्शकांकडून (मेंटाॅर) समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांनाही आम्ही बोलावणार आहोत.

बातम्या आणखी आहेत...