आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:दामदुप्पट रक्कम देण्याच्या फसवणुक प्रकरणातून बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस येणार, पोलिसांनी व्यक्त केली शक्यता

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फसवणूक प्रकरणात एकास अटक, हिंगोली पोलिसांची कारवाई

वसमत तालुक्यातील चोंढी येथील एका तरुणाच्या फसवणुक प्रकरणात कुरुंदा पोलिसांनी ज्ञानेश्‍वर जाधव (रा. वरखेडा ता. सेनगाव) यास बुधवारी ता. ३ पहाटे अटक केली आहे. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनात काही बनावट नोटा आढळून आल्या असून या प्रकरणात बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

वसमत तालुक्यातील चोंढी येथील संतोष जाधव या तरुणास एका महिन्यात रक्कम दुप्पट देण्याचे अमिष दाखवून त्याची ५ लाख रुपयांनी फसवणुक केली. या प्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात सोमवारी ता. १ रात्री उशीरा ज्ञानेश्‍वर जाधव (रा. वरखेडा ता. सेनगाव) व अन्य तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, जमादार गजानन भोपे, गजानन निर्मले, बी. टी. केंद्रे, दाभनवाड, अर्जुन पडघन यांच्या पथकाने आज पहाटे ज्ञानेश्‍वर जाधव यास अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून एक चारचाकी वाहन जप्त केले असून त्यात काही बनावट नोटा आढळून आल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे आता फसवणुक प्रकरणातून बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, संतोष जाधव यास औरंगाबाद जवळील जटवाडा येथे मारहाण करतांना पोलिसांच्या वेशात तिघे जण असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट होत आहे. त्यामुळे ज्ञानेश्‍वर जाधव याच्या माहितीनंतरच त्यांची नांवे समजू शकणार असून त्यांच्या अटकेनंतर ते पोलिसच आहेेत काय याची माहिती मिळणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले.

ज्ञानेश्‍वर च्या मोबाईलमध्ये बनावट नोटांचे व्हिडीओ

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ज्ञानेश्‍वर जाधव याच्याकडून जप्त केलेल्या मोबाईल मध्ये बनावट नोटा तयार करण्याचे व्हिडीओ, देशी कट्यांचे छायाचित्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...