आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी चिकलठाणा एमआयडीसीमधील अलमेट कॉर्पोरेशन येथे गुरुवारी करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून मतमोजणीला उशीर होण्याची शक्यता असल्याने दिवस व रात्रीसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यात एकूण २३ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १६३ पोलिस अंमलदारांचा समावेश असेल. मतमोजणी इमारत, प्रवेश गेटसह कलाग्रामसमोरील बाजू, एमएसईबी कार्यालयासमोर स्वतंत्र तुकडी असेल. मतमोजणी संपेपर्यंत गरवारे मैदान कॉर्नर (क्रांतिगुरू लहुजी साळवे चौक) ते कलाग्राम ते प्रोझोन मॉलकडे जाणारे रस्ते सर्व वाहनांसाठी बंद राहतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.