आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी ३० जानेवारीला मतदान तर २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. आठही जिल्ह्यांतील मतपेट्या औरंगाबादेत आणून एमआयडीसी चिकलठाणा, प्लॉट नंबर एफ १/१ येथे कलाग्रामसमोरील इमारतीत ठेवल्या जातील. प्रत्येक जिल्ह्याचे १५ कक्ष याप्रमाणे एकूण १२० कक्षांमध्ये मतमोजणी होणार आहे.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, पोलिस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता यांनी मंगळवारी दुपारी मतमोजणी केंद्र, स्ट्राँग रूमची पाहणी केली. मतमोजणी आणि मतपेट्यांच्या सुरक्षेत कुचराई केली तर कारवाई होईल, असा इशारा केंद्रेकर यांनी दिला. ते म्हणाले की, केंद्राची स्वच्छता, विद्युत यंत्रणा, स्वच्छ व पुरेसे पाणी, पार्किंग आदी सोयी, सुविधा उपलब्ध करावयाच्या आहेत. त्या तातडीने करा, आजपासून कामाला लागा. आठ दिवसांनी पुन्हा पूर्वतयारीची पाहणी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या वेळी निवडणूक विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस दलातील अधिकारी उपस्थित होते. मतदानासाठी तालुकानिहाय एक भरारी, एका व्हिडिओ चित्रीकरण पथकासह दोन हजारांवर अधिकारी-कर्मचारी तैनात असतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.