आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:कळमनुरी शिवारात नाल्याच्या पाण्यात वाहून गेले दांम्पत्य, गावकऱ्यांसह पोलिसांकडून शोध मोहिम सुरू

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी शिवारातूून बैलगाडीने आखाड्यावर नाल्याच्या काठावरील रस्त्याने जात असतांना अचानक नाल्याचा प्रवाह वाढल्याने बैलगाडीसह दांम्पत्य वाहून गेल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी घडला आहे. गावकऱ्यांना बैल वाचविण्यात यश आले, मात्र दांम्पत्यांचा शोध लागलाच नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील असोलवाडी येथील कुंडलीक गोविंद असोले (५५) यांनी कळमनुरी शिवारात एक शेत बटाईन केले आहे. त्या शेतातील आखाड्यावर असोले यांचे कुटुंबिय राहतात. आज सकाळच्या सुमारास कुंडलीक असोले व त्यांची पत्नी ध्रुपदाबाई कुंडलीक असोले (५०) बैलगाडीने शेतापासून तीन किलो मिटर अंतरावर असलेल्या कळमनुरी येथे आले होते. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास ते परत गावाकडे निघाले होते. दुपार पासूनच पाऊस सुरु असल्यामुळे नाल्याला पाणी आले होते. मात्र असोले दांम्पत्य बैलगाडीने नाल्याच्या काठावरील रस्त्याने आखाड्याकडे निघाले. यावेळी कळमनुरी शिवारात अचानक नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने पाण्याचा मोठा लोंढा आला. त्यामुळे असोले दांम्पत्य बैलगाडीसह वाहून गेले. हा प्रकार पाहणाऱ्या काही गावकऱ्यांनी धावत जाऊन बैलगाडी पकडली. मात्र असोले दांम्पत्याला वाचवू शकले नाही.

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक आर. व्ही. भोईटे, उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस व असोलवाडीच्या गावकऱ्यांनी नाल्यामध्ये दोघांचा शोध सुरु केला. मात्र रात्री उशीरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही.

या संदर्भात पोलिस निरीक्षक भोईटे यांनी सांगितले की, नाल्यामध्ये पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने असोले दांम्पत्य बैलगाडीसह नाल्याच्या पाण्यात गेले. सदर नाल्यातील पाणी तीन किलो मिटरावर असलेल्या पुयना तलावात जाते. त्या सर्वच ठिकाणी पाहणी करण्यात आली आहे. मात्र रात्र असल्यामुळे शोध मोहिम थांबविण्यात आली असून शनिवारी (ता. २०) सकाळी शोध मोहिम सुरु केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...