आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपात्र:अमेरिका, इंग्लंडमधील विद्यापीठांत छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यासक्रम : दानवे

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्याय-समाजनीती अाणि शेतकऱ्यांविषयीच्या धोरणासंदर्भात अमेरिका-इंग्लंडमधील विद्यापीठांत अभ्यासक्रम राबवले जातात. सावरकरांच्या नावाने गळा काढणाऱ्यांची आता राज्यपाल कोश्यारींच्या विधानावर दातखिळी बसली अाहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे औरंगाबादेत अाल्या असता अायाेजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दानवे म्हणाले, राज्यातील २२ जिल्ह्यांत आदित्य ठाकरे आणि आम्ही दौरा केला. त्यात शेतकऱ्यांनी विविध प्रश्न मांडले. परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सततच्या नुकसानीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले अाहे तरीदेखील पंचनामे कमी झाले आहेत. परभणी जिल्ह्यात पीक विम्याची तक्रार करूनदेखील शेतकरी अपात्र ठरवले जात आहेत. त्यामुळे आम्ही मोर्चा काढल्यानंतर पीक विम्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात अाहे.

मंत्री भुमरेंनी कारखान्यासाठी ऊस कुठून आणला ? रोहयोमंत्री संदिपान भुमरेंनी कारखान्यासाठी ऊस कुठून आणला याचे उत्तर द्यावे. त्याबाबत आपल्याकडे पुरावे असून ते विधान परिषदेत मांडणार असल्याचा इशारा दानवे यांनी दिला. नीलम गोऱ्हे यांची सरकारसोबत झालेली चर्चा ही केवळ अधिवेशनाच्या निमित्ताने झाली अाहे. त्यात काहीही वावगे नाही. तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटकसंदर्भात सीमाप्रश्नावर होणाऱ्या बैठकीतदेखील सहभागी होणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...