आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

औरंगाबाद अपडेट:औरंगाबादेत गुरुवारी आणखी 96 नवीन रुग्ण सापडले, आतापर्यंत 9680 कोरोनामुक्त; जिल्ह्यात 3518 जणांवर उपचार सुरू

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या गुरुवारी सकाळी 96 ने वाढली आहे. यासोबतच, औरंगाबादेतील कोरोनाग्रस्तांची एकूण आकडेवारी 13662 वर पोहोचली आहे. गुरुवारी नव्याने सापडलेल्या कोरोनाग्रस्तांपैकी 73 जण शहरातून तर 23 जण ग्रामीण भागांतून आहेत. यापैकी 65 जणांची चाचणी अँटीजेन पद्धतीने करण्यात आली होती अशी माहिती जिल्हा प्रशासनाने जारी केली आहे.

जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या माहितीनुसार, औरंगाबादेत एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 13662 झाली आहे. यात बुधवारी दिवसभरात सापडलेल्या 197 आणि गुरुवारी नव्याने सापडलेल्या 96 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 9680 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर उपचार सुरू असताना आतापर्यंत 464 रुग्ण दगावले आहेत. सद्यस्थितीला औरंगाबादमध्ये कोरोना व्हायरसचे 3518 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.