आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना महामारी:गतवर्षी एप्रिलमध्ये राज्यात 444 मृत्यू, यंदाच्या 11 दिवसांतच 3098!

औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एप्रिल 2021: नागपुरात 11 दिवसांत 399 बळी; नांदेड, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, जालन्यासह मुंबई, पुण्यात चिंताजनक स्थिती

राज्यात कोरोनाची दुसरी लाट जोरात आहे. गतवर्षी एप्रिल मध्ये संपूर्ण महिन्यात राज्यात कोरोनाने ४४४ बळी घेतले होते. यंदाच्या एप्रिलमध्ये ११ दिवसांतच कोरोनाने ३०९८ मृत्यू झाले आहेत. राज्यात कोरोनाने ११ एप्रिल २०२१ पर्यंत एकूण ५७,९८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर १.७ टक्के असून देशाच्या १.२७ टक्के मृत्यूदरापेक्षा तो जास्त आहे. राज्यातील मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे, नाशिक, सोलापूर, पालघर, औरंगाबाद, जालना येथे यंदाच्या एप्रिलमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. नागपूर मध्ये गतवर्षी एप्रिलअखेर फक्त दोन मृत्यूची नोंद होती. यंदा ११ दिवसांतच नागपुरात ३९९ बळी गेले आहेत.

यंदाच्या एप्रिलमध्ये राज्यभर रोज सरासरी २८२ मृत्यू
जिल्हा मृत्यू
अहमदनगर 70
अकोला 31
अमरावती 36
बीड 67
भंडारा 08

जिल्हा मृत्यू
बुलडाणा 26
चंद्रपूर 32
धुळे 33
गडचिरोली 11
गोंदिया 19

जिल्हा मृत्यू
हिंगोली 20
जळगाव 42
कोल्हापूर 10
लातूर 52
नंदूरबार 45

जिल्हा मृत्यू
उस्मानाबाद 45
परभणी 47
रायगड 70
रत्नागिरी 06
सांगली 56

जिल्हा मृत्यू
सातारा 55
सिंधुदुर्ग 14
वर्धा 22
वाशीम 17
यवतमाळ 49

एक ते 11 एप्रिल 2021 : सर्वाधिक मृत्यूचे 10 जिल्हे
नागपूर 399
मुंबई 315
ठाणे 278
नांदेड 270
पुणे 263
नाशिक 200
पालघर 142
औ.बाद 116
सोलापूर 111
जालना 101

बातम्या आणखी आहेत...