आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांची भव्य मिरवणूक आणि सत्‍कार:महापालिकेेची मोहीम रोखण्यासाठी बुलडोझर रोखणाऱ्या पाच महिलांचा भाकपतर्फे सत्कार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेेने हाती घेतलेली मोहीम रोखण्यासाठी बुलडोझरसमोर आडव्या झालेल्या महिलांचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हास्तरीय अधिवेशनात सत्कार करण्यात आला.

सात वर्षांपूर्वी मनपाने जयभवानीनगर, रेल्वे रुळालगत स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण हटाव मोहीम जाहीर केली. त्यासाठी दाखल झालेले बुलडोझर लक्ष्मी चलवदे, निर्मला वाकोेडे, शकुंतला दांडगे, गाडेकर आजी, अनिता दांडगे यांनी रोखले होते. महिलांच्या आक्रमक पवित्र्यामुळे महापालिकेला सर्वसाधारण सभेत पर्यायी घरांचा प्रस्ताव मंजूर करावा लागला. त्यामुळे त्यांचा भाकपच्या अधिवेशनात राज्य सहसचिव अॅड. सुभाष लांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी या महिलांची भव्य मिरवणूकही काढण्यात आली. या वेळी प्रा. डाॅ. राम बाहेती, अश्फाक सलामी, भास्कर लहाने, महिला फेडरेशनच्या राज्य सहसचिव वसुधा कल्याणकर उपस्थित होते. अधिवेशनात जिल्हा सचिवपदी अश्फाक सलामींची फेरनिवड, सहसचिवपदी भास्कर लहाने, मधुकर खिल्लारे, कैलास कांबळे यांची ४१ जणांची जिल्हा समितीवर सदस्यपदी निवड झाली.

बातम्या आणखी आहेत...