आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिथॉन प्रायोजित 15 वर्षाखालील वनडे क्रिकेट लीग स्पर्धेत पीसीए ९९ संघाने शानदार विजय मिळवला. फुलंब्री तालुक्यातील पाल येथील एचएसजे क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पीसीए संघाने महायाना संघावर नऊ गडी राखून मात केली. या लढतीत कर्णधार राघव नाईक सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
पीसीए ९९ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना महायाना संघाने २८ षटकांत सर्वबाद ११५ धावा उभारल्या. यात सलामीवीर कृष्णा खवल याने एकाकी लढत देत अर्धशतक झळकावले. त्याने ४६ चेंडूंत तीन षटकार व सहा चौकार लगावत ५० धावांची आक्रमक खेळी केली. मंगेश मते (११), तळातील फलंदाज आयुष गजहंसच्या नाबाद १० व दुर्वाक कुलकर्णीने ११ धावा केल्या. इतर फलंदाजानी निराशा केली. त्यांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.
कृष्णा वाघमारे (०), ऋषी जाधव (०), कर्णधार अभिषेक भोसले (३), अशरफ शेख (१), आदित्य माळी (२), प्रेम जमधाडे (९) हे आल्यापावली तंबूत परतले. पीसीए ९९ संघाकडून भेदक मारा करत अभिराम गोसावीने १० षटकांत २० धावा देत सहा अर्धा डझन फलंदाजाना तंबूत पाठवले. शाश्वत पुराणिक याने ४१ धावा देत 3 गडी बाद केले. भूमिका चव्हाणने एकाला टिपले.
प्रत्युरात पीसीए ९९ संघाने १३.४ षटकांत एक गडी गमावत ११९ धावा करत विजय मिळवला. यात संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रुद्राक्ष बोडके अवघ्य एका धावेवर परतला. त्यानंतर संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेत कर्णधार राघव नाईकचे शानदार नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाला विजयी केले.
राघव नाईक याने ४५ चेंडूत 12 सणसणीत चौकार मारत नाबाद ५४ धावा ठोकल्या. राघव व सोहम या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी नाबाद १०८ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. सोहम राठोडने ३३ चेंडूंचा सामना करताना 8 चौकार व 1षटकार खेचत नाबाद 43 धावा काढल्या. संघाला 22 धावा अतिरिक्त मिळ्याला. महायानाकडून मंगेश मतेने एकमेव गडी बाद केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.